२० गावांचा वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 11:52 PM2019-04-12T23:52:51+5:302019-04-12T23:53:22+5:30

वादळी वाऱ्यामुळे १२ एप्रिल रोज्पाी सायंकाळी ४ वाजता ३३ के.व्ही. वीज वाहिनीच्या तारा तुटल्याने परिसरातील २० गावांचा वीजपुरवठा खंडित झाला असून ही रात्री उशिरापर्यंत हा वीजपुरवठा पूर्ववत न झाल्याने ही सर्व गावे अंधारात आहेत.

Power supply of 20 villages disrupted | २० गावांचा वीजपुरवठा खंडित

२० गावांचा वीजपुरवठा खंडित

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
पाथरी (परभणी): वादळी वाऱ्यामुळे १२ एप्रिल रोज्पाी सायंकाळी ४ वाजता ३३ के.व्ही. वीज वाहिनीच्या तारा तुटल्याने परिसरातील २० गावांचा वीजपुरवठा खंडित झाला असून ही रात्री उशिरापर्यंत हा वीजपुरवठा पूर्ववत न झाल्याने ही सर्व गावे अंधारात आहेत.
तालुक्यातील हादगाव बु. येथील ३३ के.व्ही. केंद्रासाठी पाथरी येथून मुख्य वाहिनी गेली आहे. शुक्रवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास या परिसरात वादळी वारे सुटले. त्यात हादगाव जवळील पाथरी-आष्टी रस्त्यावरील दोन्ही बाजूचे वीजखांब वाकून तारा तुटल्या. त्यामुळे काही काळ या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. महावितणच्या कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर आडव्या झालेल्या तारा तोडल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. तसेच वडी, निवळी परिसरातील ४ गावांचा वीजपुरवठा पूर्ववत झाला. मात्र हादगाव, वरखेड या भागातील १७ गावांचा वीजपुरवठा रात्री उशिरापर्यंत सुरू न झाल्याने या गावांमधील ग्रामस्थांंना रात्र अंधारात काढावी लागणार आहे.

Web Title: Power supply of 20 villages disrupted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.