परभणीत पावसाची रिपरिप; पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 12:28 AM2018-03-17T00:28:39+5:302018-03-17T00:28:52+5:30
परभणी शहरासह जिल्हाभरात शुक्रवारी दिवसभर रिमझिम पाऊस झाला. या पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : परभणी शहरासह जिल्हाभरात शुक्रवारी दिवसभर रिमझिम पाऊस झाला. या पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
शुक्रवारी पहाटेपासूनच पावसाची भुरभुर सुरु झाली होती. जिंतूर, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, सेलू शहरासह बोरी, मानवत, पोखर्णी नृसिंह, येलदरी, लिंबा, वस्सा येथेही पावसाची रिपरिप सुरुच होती. पालममध्ये सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास अर्धातस चांगला पाऊस झाला. तर परभणी शहरामध्येही झालेल्या पावसामुळे किरकोळ विक्रेत्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती़
तसेच पावसामुळे सखल भागामध्ये पाणी साचून अनेक रस्त्यावर चिखल तयार झाला होता. शिवाय अचानक आलेल्या पावसामुळे काढणीला आलेल्या गहू, ज्वारी, हरभरा या पिकांसह भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे.