परभणी जिल्ह्यात पावसाची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 12:12 AM2020-02-03T00:12:15+5:302020-02-03T00:12:30+5:30
रविवारी सायंकाळच्या सुमारास जिल्ह्यातील विविध भागांत अचानक पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात गारवा वाढला होता़ यावर्षीच्या पावसाळ्यात परतीच्या पावसाने खरीप पिकांचे नुकसान झाले आहे़ रबी हंगाम आता चांगला बहरात असतानाच रविवारी सायंकाळच्या सुमारास परभणी शहरासह सोनपेठ, गंगाखेड तालुक्यांमध्ये पावसाने हजेरी लावली़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : रविवारी सायंकाळच्या सुमारास जिल्ह्यातील विविध भागांत अचानक पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात गारवा वाढला होता़
यावर्षीच्या पावसाळ्यात परतीच्या पावसाने खरीप पिकांचे नुकसान झाले आहे़ रबी हंगाम आता चांगला बहरात असतानाच रविवारी सायंकाळच्या सुमारास परभणी शहरासह सोनपेठ, गंगाखेड तालुक्यांमध्ये पावसाने हजेरी लावली़
परभणी शहरात सायंकाळी ७़३० वाजेच्या सुमारास अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाली़ १५ मिनिटे हा पाऊस झाला़ तालुक्यातील पिंगळी, पोखर्णी या भागातही पाऊस झाल्याचे वृत्त आहे़ त्यानंतर गंगाखेड, सोनपेठमध्येही पावसाने हजेरी लावली आहे़ या पावसामुळे पिकांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे़