पत्रकार परिषद :शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर महसूलमंत्र्यांना साकडे घालणार-रमेश दुधाटे गोळेगावकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 01:01 AM2018-06-24T01:01:54+5:302018-06-24T01:03:16+5:30
शेतकºयांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी तसेच गोदावरी नदीकाठावरील गावांमध्ये निर्माण झालेल्या समस्या सोडविण्या संदर्भात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना रविवारच्या दौºयात निवेदन देऊन साकडे घालणार असल्याची माहिती स्वच्छ भारत अभियानचे जिल्हाध्यक्ष रमेश दुधाटे गोळेगावकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शेतकºयांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी तसेच गोदावरी नदीकाठावरील गावांमध्ये निर्माण झालेल्या समस्या सोडविण्या संदर्भात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना रविवारच्या दौºयात निवेदन देऊन साकडे घालणार असल्याची माहिती स्वच्छ भारत अभियानचे जिल्हाध्यक्ष रमेश दुधाटे गोळेगावकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
महसूलमंत्री चंद्रकांत पाटील रविवारी जिल्ह्याच्या दौºयावर येत आहेत. या अनुषंगाने आयोजित पत्रकार परिषदेत रमेश दुधाटे म्हणाले की, जिल्ह्यातील ७ तालुके गोदावरीच्या काठावर आहेत. या तालुक्यांमधील गोदाकाठावरील १५९ गावांमध्ये विविध मुलभूत प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामध्ये स्मशानभूमी, शेतकºयांचा विद्युत पुरवठा, दळण-वळणाच्या सुविधा, गोदावरी काठावरील गावांना एकमेकांशी जोडणे, निसर्गसंपन्न पर्यटनस्थळ असलेल्या जांभूळबेटचा विकास करणे, रेशीम, ऊस उत्पादक शेतकºयांच्या अडचणी सोडविणे आदीबाबत महसूलमंत्री पाटील यांना मागण्यांचे निवेदन देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. याशिवाय पिंगळी-लिमला-वझूर-रावराजूर- मरडसगाव या राज्य मार्ग ३५ वरील गोदावरी नदीवरील पुलाच्या भूमिपूजन कार्यक्रमप्रसंगी पूर्णा तालुक्यातील ५ पाणंद रस्त्यांच्या कामाचे उद्घाटनही करण्यात येणार आहे. त्यामध्ये वझूर-ठोळा पाणंद, वझूर ते रेणकापूर, वझूर ते वझूर शीव, वझूर ते बोरवण, वझूर ते खंडाळा या पाणंद रस्त्यांचा समावेश आहे. या पत्रकार परिषदेस अॅड.गंगाधरराव पवार, जि.प.सदस्य डॉ.सुभाष कदम, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, मेघना बोर्डीकर, वझूरचे सरपंच लक्ष्मण लांडे, रावराजूरचे सरपंच व्यंकटी काळे, मोहन कुलकर्णी, भीमराव वायवळ, सुरेश भुमरे आदींची उपस्थित होती.
आज पुलाच्या कामाचे भूमिपूजन
गोदावरी नदीवर वझूर गावाजवळ सा़बां़च्या वतीने १७ कोटी रुपये खर्च करुन उभारण्यात येणाºया पुलाचे बांधकाममंत्री पाटील यांच्या हस्ते रविवारी सकाळी १० वाजता भूमिपूजन होणार आहे. अध्यक्षस्थानी अॅड. गंगाधरराव पवार तर मार्गदर्शक म्हणून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे, प्रमुख पाहुणे म्हणून पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर, जलसंधारणमंत्री प्रा.राम शिंदे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, खा.संजय जाधव, जि.प.अध्यक्षा उज्ज्वला राठोड, आ.विप्लव बजोरिजा, आ.डॉ.मधुसूदन केंद्रे, जि.प.सदस्य श्रीनिवास जोगदंड, अशोक बोखारे, माधवराव दुधाटे, आबासाहेब पवार, बबन पवार, मुंजाभाऊ शिंदे, अशोक शिंदे आदींची उपस्थिती राहणार आहे़