प्रिन्सच्या तीन विद्यार्थांची उपग्रह बनविण्यासाठी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:08 AM2021-01-24T04:08:29+5:302021-01-24T04:08:29+5:30

विद्यार्थ्यांची देशभरातील १ हजार विद्यार्थ्यांमध्ये उपग्रह बनविण्यासाठी निवड करण्यात आली. या विद्यार्थ्यांकडून १०० उपग्रह बनवून एकाच वेळी अवकाशात सोडण्याचा ...

Prince's three students selected to make satellites | प्रिन्सच्या तीन विद्यार्थांची उपग्रह बनविण्यासाठी निवड

प्रिन्सच्या तीन विद्यार्थांची उपग्रह बनविण्यासाठी निवड

Next

विद्यार्थ्यांची देशभरातील १ हजार विद्यार्थ्यांमध्ये उपग्रह बनविण्यासाठी निवड करण्यात आली.

या विद्यार्थ्यांकडून १०० उपग्रह बनवून एकाच वेळी अवकाशात सोडण्याचा जागतिक विक्रम करण्याचा उपक्रम डॉ.एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन तर्फ राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात विद्यार्थ्यासाठी तंत्रज्ञानाच्या स्वप्नपूर्तीसाठी देशभरातील विद्यार्थ्यांनी बनविलेले १०० उपग्रह एकाच वेळी प्रक्षेपित करण्यात येणार आहेत. या उपक्रमात प्रिन्स इंग्लिश सीबीएसई स्कूलचे २ विद्यार्थी स्वप्निल मोरे व केदार तरवडगे व ज्ञानतीर्थ विद्यालयाची सलोनी डख यांची निवड झाली आहे. उपग्रह बनविण्याचे ऑनलाइन प्रशिक्षण ते सध्या घेत आहेत. या उपक्रमामुळे शेकडो विद्यार्थांना उपग्रह बनविण्याची संधी मिळणार आहे. या उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांची जागतिक पातळीवर नोंद वर्ल्ड बुक रेकॉर्ड, अशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये केली जाणार आहे. अशी माहिती कलाम इंटरनेशनल फाउंडेशनचे सचिव मिलिंद चौधरी यांनी दिली आहे. ७ फेब्रुवारीला डीआरडीओचे चेअरमन यांच्या उपस्थितीत रामेश्वरम येथून हेलियम बलूनमार्फत पृथ्वीच्या मार्फत पृथ्वीच्या समांतर कक्षेत हे उपग्रह अवकाशात सोडण्यात येतील. या प्रकल्पात सहभागी झाल्याबद्दल विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. आपल्या शाळेतील तीन विद्यार्थ्यांची उपग्रह बनविण्यासाठी निवड झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ.संजय रोडगे, सचिव डॉ.सविता रोडगे, डॉ.रामराव रोडगे, डॉ.अपूर्वा रोडगे, डॉ.आदित्य रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा.महादेव साबळे, शाळेच्या प्राचार्या मीना महाजन, मुख्याध्यापिका शालिनी शेळके, मार्गदर्शक शिक्षक नारायण चौरे, विठ्ठल सरकटे, भगवान शिरसागर, विष्णू ताठे, कांबळे यांंनी सत्कार केला.

सेलूसाठी गौरवाची बाब

सेलूसारख्या ग्रामीण भागातून आमच्या प्रतिष्ठानमधील विद्यार्थी जागतिक, आशिया व भारतीय स्तरावर विक्रम करणार आहेत. याचा मला सार्थ अभिमान आहे. यापूर्वी विज्ञान दिनी आमच्या प्रतिष्ठानमधील विद्यार्थी, आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या स्वयंम उपग्रह निर्मितीपासून प्रेरणा घेत, ही गौरवास्पद कामगिरी करत आहेत. या पुढेही आमचे विद्यार्थी असे विक्रम करून आमचे व सेलूवासीयांचे नाव जागतिक पातळीवर नेतील, असा मला विश्वास आहे.

-डॉ. संजय रोडगे अध्यक्ष, श्रीराम प्रतिष्ठान सेलू

Web Title: Prince's three students selected to make satellites

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.