कुंटणखान्यावर छापा; दोघांना अटक
By Admin | Published: April 29, 2015 12:34 AM2015-04-29T00:34:08+5:302015-04-29T15:49:40+5:30
जालना : येथील पोलीस अधीक्षकांचे विशेष पथक तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी सोमवारी रात्री संयुक्तरित्या काद्राबाद
जालना : येथील पोलीस अधीक्षकांचे विशेष पथक तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी सोमवारी रात्री संयुक्तरित्या काद्राबाद भागातील एका कुंटणखान्यावर छापा मारून दोघांना अटक केली. तर एकजण फरार झाला. एका आन्टीसह ४ महिलांना यावेळी ताब्यात घेतले.
शहरातील काद्राबाद भागात गेल्या अनेक दिवसांपासून एक आन्टी इतर महिलांच्या सहाय्याने त्यांचा देहविक्रीचा व्यवसाय चालवत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांना मिळाली. पोलिस अधीक्षक यांचे विशेष पथक तसेच स्थागुशाच्या पथकाने संयुक्तरित्या या कुंटणखान्यावर छापा मारला.
या पथकाने सुरूवातीला तेथे एक बनावट ग्राहक पाठवून देहविक्री सुरू असल्याची खात्री केली व नंतर छापा मारला. सदर ठिकाणी आन्टी ४ महिलांच्या सहाय्याने पैसे घेऊन त्या महिलांना देहविक्री करण्यास भाग पाडताना मिळून आली. त्याचप्रमाणे तेथे नागेश दत्तात्रय डवले (वय २५, रा. ब्राह्मणखेडा, ता.जि. जालना), गणेश सदानंद मांडोगळे (वय ३०, रा. खरपुडी) व रवि कुमार (वय २५, रा. रामनगर) हे आढळून आले. मात्र या तिघांपैकी रविकुमार हा आरोपी फरार झाला. तर उर्वरीत दोघांना अटक करण्यात आली.
पाच महिलांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांच्या ताब्यातून रोख रक्कम, मोबाईल हॅन्डसेट व वाहने असा एकूण ९४ हजार ७३० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.
पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी, महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक शुभांगी सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक सुरेश भाले, कल्याण आटोळे, दीपक पाटील, सचिन चौधरी, राजू पवार, बालाजी कुटवडे, इरफान शेख, शिवप्रसाद एखंडे, निवृत्ती फड, महिला पोलिस कॉन्स्टेबल अर्चना आधे, नम्रता कांबळे,दीपाली भागवत यांनी ही कार्यवाही केली. (प्रतिनिधी)