परभणीत पशू प्रदर्शनातील विजेत्या म्हशीची काढली मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 06:32 PM2019-02-05T18:32:02+5:302019-02-05T18:40:45+5:30
परभणी : जालन येथे पार पडलेल्या अखिल भारतीय पशू प्रदर्शनामध्ये १ लाख रुपयांचे बक्षिस मिळविणाऱ्या परभणीतील विनायक लुबाळे यांच्या ...
परभणी : जालन येथे पार पडलेल्या अखिल भारतीय पशू प्रदर्शनामध्ये १ लाख रुपयांचे बक्षिस मिळविणाऱ्या परभणीतील विनायक लुबाळे यांच्या म्हशीची शहरातून ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली़
जालना येथे अखिल भारतीय स्तरावरील पशू प्रदर्शन नुकतेच पार पडले़ या प्रदर्शनामध्ये विनायक नामदेवराव लुबाळे यांच्या म्हशीने जाफराबादी प्रकारात १ लाख रुपयांचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळविले आहे़ तसेच मारोतराव बनसोडे यांच्या म्हशीने उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविले़ परभणी जिल्ह्याला या पशू प्रदर्शनात अनेक पारितोषिके मिळाली आहेत.
दरम्यान, पारितोषिक प्राप्त म्हैस मंगळवारी शहरात दाखल झाल्यानंतर खंडोबा बाजार येथून ट्रकमधे बसून या म्हशीची मिरवणूक काढण्यात आली़ शिवाजी चौक, भजन गल्ली आणि परत खंडोबा बाजार या मार्गावरून ढोल ताशांच्या गजरात ही मिरवणूक काढण्यात आली़ यावेळी विनायकराव लुबाळे, ज्ञानेश्वर चिंचाणे, संतोष लुबाळे, रामदास लुबाळे, परमेश्वर चिंचणे, किशोर काळे, अनिल आव्हाड, बालासाहेब जगाडे, गणेशराव सोळंके, गौतम नाटकर आदींची उपस्थिती होती.
पहा व्हिडिओ :