शासकीय कर्मचाऱ्यांची दिरंगाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:10 AM2020-12-28T04:10:09+5:302020-12-28T04:10:09+5:30

काॅंक्रीट रस्त्यावर आळे घालून पाणी द्या गंगाखेड - परभणी- गंगाखेड राष्ट्रीय महामार्ग सिमेंट काॅंक्रीट रस्ता होत आहे. सिमेंट काॅंक्रीट ...

Procrastination of government employees | शासकीय कर्मचाऱ्यांची दिरंगाई

शासकीय कर्मचाऱ्यांची दिरंगाई

Next

काॅंक्रीट रस्त्यावर आळे घालून पाणी द्या

गंगाखेड - परभणी- गंगाखेड राष्ट्रीय महामार्ग सिमेंट काॅंक्रीट रस्ता होत आहे. सिमेंट काॅंक्रीट रस्ता मजबुतीसाठी रस्ता झाल्यानंतर आळे करून पाणी देणे गरजेचे आहे. त्यामुळे आळे करून त्या आळ्यामध्ये पाणी भरलेले ठेवल्यास सिमेंट क्राॅंक्रीट रस्ता दीर्घकाळ टिकून राहण्यास मदत होते. मात्र या रस्त्यावर पाणी शिंपडले जात असल्याने रस्त्याच्या मजबुतीचा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.

गंगाखेड तालुक्यात १६ ग्रुप ग्रामपंचायत

गंगाखेड- तालुक्यातील ७० ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. यात १६ ग्रुप ग्रामपंचायत समिती आहेत. ग्रुप ग्रामपंचायत समितीच्या सरपंच पदासाठी इतर गावच्या सदस्याचा प्रभाव पडतो. ग्रुप ग्रामपंचायत निवडणूक अटीतटीची निवडणूक म्हणून ओळखली जाते. गंगाखेड तालुक्यातील बडवणी,बोथी,बोर्डा,दगडवाडी,खळी, लिंबेवाडी,मसला,मरडसगाव,पडेगाव,पांगरी,राणीसावरगाव,सायळा,सागळेवाडी,सुरळवाडी,सुप्पा,पिपळदरी या ग्रुप ग्रामपंचायत समिती आहेत.

गव्हावरील पिकावर किडीचा प्रादुर्भाव

गंगाखेड- रब्बी हंगामातील गहू शास्वत उत्पादन देणारे पीक आहे. वातावरणातील व्हायरल विषाणूचा प्रादुर्भाव गव्हाच्या पिकावर आढळत आहे. या पिकावर मुळ्यांना लागलेला मावा, जमिनीलगत गहू पिकाच्या खोडावर रस शोषण करणारी कीड,यामुळे गव्हाच्या मुळावर बुरशी निर्माण होऊन पीक पिवळे पडत आहे. पिवळे पडल्याने गव्हाच्या कच्चा ओंब्यातच पीक वाळून जात आहे. याचा गव्हाच्या उत्पादनावर मोठा परिणाम होऊन उत्पादनात घट निर्माण होण्याची भीती गहू उत्पादक शेतकऱ्यात निर्माण झाली आहे.

Web Title: Procrastination of government employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.