इथेनॉल प्रकल्पातून नवीन रोजगार निर्मितीस चालना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:13 AM2020-12-26T04:13:56+5:302020-12-26T04:13:56+5:30

राजेंद्र नागवडे म्हणाले, अत्यंत कमी कालावधीत कारखान्याने हा टप्पा पूर्ण केला आहे. कारखान्याची प्रति दिन क्षमता २ हजार ५०० ...

Promoting new jobs from the ethanol project | इथेनॉल प्रकल्पातून नवीन रोजगार निर्मितीस चालना

इथेनॉल प्रकल्पातून नवीन रोजगार निर्मितीस चालना

Next

राजेंद्र नागवडे म्हणाले, अत्यंत कमी कालावधीत कारखान्याने हा टप्पा पूर्ण केला आहे. कारखान्याची प्रति दिन क्षमता २ हजार ५०० मे टन असताना एका दिवसात ३ हजार ६८५ मे टन विक्रमी गाळप करण्यात आले. शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद, तोडणी व वाहतूक कामगारांचे सहकार्य आणि कर्मचाऱ्यांच्या परिश्रमामुळे चालू गळीत हंगामात ४ लाख ५० हजार मे टनापेक्षा अधिक ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे पुढील वर्षी ६ लाख मे. टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस लागवड करून त्याची नोंद कारखान्याकडे करावी, असे आवाहन यावेळी त्यांनी केले. चालू हंगामात ऊस बिलाचा पहिला हप्ता २ हजार रुपये प्रति टन याप्रमाणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आला आहे. सातत्यपूर्ण कामगिरी करीत या कारखान्याच्या इतिहासात प्रथमच विक्रमी गाळप केले आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याचा उसाचे गाळप होणार असल्याची ग्वाही नागवडे यांनी यावेळी दिली. त्याचप्रमाणे कारखाना परिसरामध्ये ४५ हजार लिटर प्रतिदिन क्षमता असलेल्या इथेनॉल प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Promoting new jobs from the ethanol project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.