नागपूर-मुंबई मार्गाच्या धर्तीवरच परभणीतून जाणाऱ्या समृद्धीचा मावेजा मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2022 06:43 PM2022-01-01T18:43:31+5:302022-01-01T18:43:57+5:30

नागपूर-मुंबई दरम्यान समृद्धी महामार्गाचे काम सुरू झाले आहे. या महामार्गाला जोडणारा जालना ते नांदेड या समृद्धी महामार्गास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे.

Prosperity passing through Parbhani will be rewarded only on the lines of Nagpur-Mumbai route | नागपूर-मुंबई मार्गाच्या धर्तीवरच परभणीतून जाणाऱ्या समृद्धीचा मावेजा मिळणार

नागपूर-मुंबई मार्गाच्या धर्तीवरच परभणीतून जाणाऱ्या समृद्धीचा मावेजा मिळणार

googlenewsNext

परभणी : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर रेडी रेकनर दराच्या पाचपट्टीने परभणी जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाचा मोबदला संबंधित शेतकऱ्यांना देण्यात येईल, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली असल्याची माहिती आ. डॉ. राहुल पाटील यांनी दिली.

नागपूर-मुंबई दरम्यान समृद्धी महामार्गाचे काम सुरू झाले आहे. या महामार्गाला जोडणारा जालना ते नांदेड या समृद्धी महामार्गास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. हा महामार्ग परभणी जिल्ह्यातील ४४ गावांमधून जाणार आहे. यासंदर्भातील आदेश ६ सप्टेंबर रोजी राज्य शासनाने काढला आहे. तसेच याबाबतची अधिसूचनाही प्रसिद्ध करण्यात आली आहे. परभणी जिल्ह्यातील सेलू, जिंतूर, परभणी, पूर्णा या चार तालुक्यांमधून हा महामार्ग जात आहे. या महामार्गासाठी लागणाऱ्या जमिनीचे भूसंपादन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून करण्यात येणार आहे. सदरील भूसंपादनाचा मावेजा संबंधित शेतकऱ्यांना मिळण्याबाबत विविध चर्चा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या. या पार्श्वभूमीवर सुरू होत्या. याबाबत आमदार डॉ. राहुल पाटील यांनी मंगळवारी विधानसभेत यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला.

राज्य शासनाने शेतकऱ्यांना मोबदला देण्यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली. या अनुषंगाने उत्तर देताना सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे म्हणाले की, नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर परभणी जिल्ह्यातून जाणाऱ्या द्रुतगती महामार्गासाठी जमीन संपादनाचा मोबदला दिला जाणार आहे. रेडी रेकनर दराच्या पाचपट यासंदर्भातील मोबदला देण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कसलाही गैरसमज निर्माण करून घेऊ नये, असे आश्वासन मंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात दिली असल्याचे आमदार डॉ. राहुल पाटील म्हणाले. त्यामुळे आता जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामहामार्गाच्या जमिनीच्या अनुषंगाने उपस्थित होणाऱ्या शंका दूर झाल्या आहेत, असेही आमदार पाटील म्हणाले.

Web Title: Prosperity passing through Parbhani will be rewarded only on the lines of Nagpur-Mumbai route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.