वन अधिकाऱ्याच्या खुर्चीला हार घालून निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:14 AM2021-06-25T04:14:28+5:302021-06-25T04:14:28+5:30

सामाजिक वनीकरणच्या कार्यालयात वनक्षेत्रपाल, क्लार्क, टिएसपी व कोणताही संबंधित कर्मचारी उपस्थित राहत नसल्याने आवक जावक विभाग, शेतकऱ्यांचे प्रस्ताव स्विकारण्यासाठी ...

Protest by placing a garland on the chair of the forest officer | वन अधिकाऱ्याच्या खुर्चीला हार घालून निषेध

वन अधिकाऱ्याच्या खुर्चीला हार घालून निषेध

Next

सामाजिक वनीकरणच्या कार्यालयात वनक्षेत्रपाल, क्लार्क, टिएसपी व कोणताही संबंधित कर्मचारी उपस्थित राहत नसल्याने आवक जावक विभाग, शेतकऱ्यांचे प्रस्ताव स्विकारण्यासाठी कोणीही उपलब्ध नाही. सर्व कारभार प्रभारी व जिल्ह्यावरून चालत असल्याने मनरेगा अतंर्गत शेतकऱ्यांसाठी शेतात, बांधावर वृक्ष लागवड संदर्भात आग्रही भूमिका घेऊनही सामाजिक वनीकरण विभागाच्या उदासिन कारभारामुळे वृक्षारोपण कार्यक्रमाला केराची टोपली दाखवली आहे. शेतकऱ्यांना वृक्ष लागवडीचे मस्टर काढण्यासाठी परभणीला हेलपाटे घालावे लागत आहेत. याबाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष रामेश्वर गाडेकर यांनी तक्रार केल्यानंतर उपजिल्हाधिकारी डाॅ.अरूण जऱ्हाड यांनी तत्काळ कारवाई करण्याचे आदेश उपविभागीय वन अधिकारी वाकचौरे यांना दिले. परंतू, कोणतीही कारवाई वनीकरण विभागाने केली नाही. यामुळे हे आंदोलन करण्यात आले. आरएफओ, क्लार्क, टिएसपी ही सेलु विभागाची पदे तत्काळ न भरल्यास तसेच शेतकऱ्यांचे मस्टर न काढल्यास उपविभागीय कार्यालय परभणी येथे आदोलंन करण्यात येईल, असा इशारा निषेध आंदोलनावेळी पदाधिकाऱ्यांनी दिला. आंदोलनात राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष रामेश्वर गाडेकर, पं.स.सदस्य संपतराव राठोड, अक्षय जाधव, अजय गाडेकर, शेख अन्वर, पिंटु गाडेकर, आकाश गाडेकर, रामेश्वर गाडेकर सहभागी झाले होते.

Web Title: Protest by placing a garland on the chair of the forest officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.