सीसीआयकडून साडेतीन लाख क्विंटल कापसाची खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:16 AM2021-01-17T04:16:03+5:302021-01-17T04:16:03+5:30
तालुक्यात ४३ हजार ९७ हेक्टरवर पेरणी झालेली आहे. यामध्ये कापसाची २१ हजार ६३५ हेक्टरवर सर्वाधिक पेरणी झाली आहे. ...
तालुक्यात ४३ हजार ९७ हेक्टरवर पेरणी झालेली आहे. यामध्ये कापसाची २१ हजार ६३५ हेक्टरवर सर्वाधिक पेरणी झाली आहे. तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा कल शासकीय खरेदी केंद्रावर कापूस विक्री करण्याकडे मोठया प्रमाणात असल्याचे चित्र दिसून आले. २० नोव्हेंबर रोजी सीसीआयने हमीदाराने कापसाची खरेदी सुरु केली. जिल्ह्यासह परजिल्ह्यातील शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे यार्डात आपला कापूस विक्रीसाठी घेऊन येत आहेत. दररोज ८०० ते ९०० वाहन यार्डात दाखल होत असून १० हजार क्विंटल कापसाची आवक येत आहे. मागील दोन महिन्यात सीसीआयने एकूण ३ लाख ५० हजार क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. दुसरीकडे खाजगी बाजारात सुरवातीला कापसाला ५१०० ते ५२०० रुपये भाव मिळाला होता. मात्र मागील आठवडात खाजगी बाजारात कापसाच्या भावात वृद्धी दिसून येत आहे. सद्यस्थितीत १२ पैकी ३ जिनिंग व्यापाऱ्यांनी खरेदी सुरु केली असून ५५०० रुपये भाव मिळत आहे. मात्र हमी दरापेक्षा २०० रुपये दर कमी मिळत असल्याने शेतकरी सीसीआयलाच कापूस खरेदीसाठी प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे.
पर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कापसाची होणार खरेदी
सीसीआयने कापूस खरेदी संदर्भात मर्यादा घालून दिल्याने दररोज मर्यादितच कापूस खरेदी होणार होती. यामुळे केवळ मानवत तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा कापूस करण्यास बाजार समितीने प्राधान्य दिले होते. मात्र आता सीसीआयने खरेदी वाढविल्याने १८ जानेवारी पासुन कापूस घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांनी कापूस विक्री करण्यासाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे सोबत आणावी असे आव्हान बाजार समितीचे सभापती
पंकज आंबेगावकर यांनी केले आहे.