परभणी बाजार समितीत खरेदी ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 12:58 AM2018-09-20T00:58:28+5:302018-09-20T00:59:31+5:30
व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करण्याची कार्यवाही मागे घ्यावी, या मागणीसाठी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापारी असोसिएशनने प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने बुधवारी बाजार समितीतील खरेदी ठप्प झाली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करण्याची कार्यवाही मागे घ्यावी, या मागणीसाठी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापारी असोसिएशनने प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने बुधवारी बाजार समितीतील खरेदी ठप्प झाली होती.
दिवसभरात कुठेही शेतमालाची खरेदी झाली नाही. कृषी उत्पन्न बाजार समितीतील चार व्यापाºयांवर परवाना रद्दची कार्यवाही प्रस्तावित करण्यात आली आहे. ही कारवाई म्हणजे व्यापाºयांवर दबावतंत्र असून, अशा वातावरणात खरेदी होणे शक्य नाही. तेव्हा ही कारवाई परत घ्यावी, या मागणीसाठी व्यापाºयांनी बाजार समितीत बंद पुकारला आहे. त्यामुळे बुधवारी बाजार समितीतील सर्व दुकाने बंद राहिली. परिणामी शेतमालाची खरेदी ठप्प झाली होती. व्यापाºयांवरील कारवाई मागे घेतली जात नाही, तोपर्यंत मोंढ्यातील प्रतिष्ठाने बंद ठेवणार असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष मोतीलाल जैन यांनी दिली. दरम्यान, गुरुवारी मोहरमची सुटी असून, शुक्रवारचा एक दिवस वगळता शनिवार व रविवार सुटीचे दिवस आहेत. त्यामुळे सोमवारपर्यंत बाजारपेठेतील खरेदी बंद राहण्याची शक्यता आहे.
चार व्यापाºयांवरील कारवाई संदर्भात चर्चा करण्यास तयार आहे. मात्र व्यापाºयांनीही चुकीची भूमिका घेऊ नये. सकारात्मक दृष्टीने चर्चा केली जाईल. मात्र, नियमांचे उल्लंघन होत असेल तर कारवाई केली जाईल.
-मंगेश सुरवसे,
जिल्हा उपनिबंधक