वडिलांच्या डोक्यात वीट घातली; भावालाही मारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:22 AM2021-07-07T04:22:20+5:302021-07-07T04:22:20+5:30
परसावतनगर भागातील नरसिंग गोपाळ गुंजरगे हे ४ जूनच्या रात्री घरात असताना त्यांचा मोठा मुलगा कृष्णा गुंजरगे हा दारू पिऊन ...
परसावतनगर भागातील नरसिंग गोपाळ गुंजरगे हे ४ जूनच्या रात्री घरात असताना त्यांचा मोठा मुलगा कृष्णा गुंजरगे हा दारू पिऊन आला. व त्याने त्याचा लहान भाऊ गजेंद्र यास दुकान चालू करून का देता, असे म्हणून गजेंद्रला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी वडील नरसिंग गुंजरगे हे गजेंद्र यास मारू नको, म्हणत आले असता कृष्णा याने त्यांच्या डोक्यात बाजूला पडलेली वीट उचलून मारली. यात त्यांना गंभीर दुखापत झाली. तसेच जीवे माारण्याची धमकी दिली. त्यानंतर कृष्णा याने गजेंद्र यालाही थापडबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी नातेवाईक व इतरांनी येऊन सोडवासोडवी केली. दवाखान्यात उपचार घेतल्यानंतर नरसिंग गोपाळ गुंजरगे यांनी याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात सोमवारी फिर्याद दिली. त्यावरून आरोपी कृष्णा गुंजरगे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.