गंगाखेड पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:22 AM2020-12-30T04:22:41+5:302020-12-30T04:22:41+5:30

गंगाखेड शहरात २६ डिसेंबर रोजी देवळे जिंनिग काॅलनीत घरफोडी करून सोन्या- चादीच्या दागिण्यासह अडिच लाखाची चोरी झाली. तसेच २४ ...

Question mark on efficiency of Gangakhed police | गंगाखेड पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

गंगाखेड पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

googlenewsNext

गंगाखेड शहरात २६ डिसेंबर रोजी देवळे जिंनिग काॅलनीत घरफोडी करून सोन्या- चादीच्या दागिण्यासह अडिच लाखाची चोरी झाली. तसेच २४ डिसेंबर रोजी मध्यरात्री तहसील कार्यालय, न्यायालय परिसरात असलेल्या संत गाडगेबाबा महाराज व्यापार संकुलातील तीनं दुकाने फोडून ६२ हजारासह मुद्देमाल लंपास करण्यात आला. १५ डिसेंबर मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराज व्यापार संकुलातील तळ मजल्यावरच्या रस्त्यावर परराज्यातील भिक्षुक महिलेस अमानुषपणे मारहाण करण्यात आली. सदरील महिला घटना घडल्यापासुन मिळूण आली नाही. या महिलेचे बरे्- वाईट झाल्याचा संशय आहे. या प्रकाराने शहरातील महिलांमध्ये भितीचे वातावरण आहे. २८ डिसेंबर रोजी पोलीस स्टेशन समोर किरकोळ वादातुन अजित गायकवाड व दिपक जाधव याच्यावर झालेला चाकु हल्ला आदी भयभित करणाऱ्या घटना घडल्या आहेत. पोलीस मात्र दुचाकी वाहनावर दंड आकारणीतच अधिक लक्ष केद्रीत करून सर्व सामान्य जनतेला नियमावर बोट ठेऊन त्रास दिला जात आहे. सरत्या वर्षातील पंधरवाड्यात घडलेल्या घटनेने गंगाखेड पोलिसावर कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

एकाही घटनेचा तपास लागेना

गंगाखेड शहरात सरत्या वर्षाच्या पंधरवड्यात नागरिकांना भयभित करणाऱ्या घटना घडल्या आहेत. मात्र या एकाही घटनेचा तपास लावण्यास पोलीस यंत्रणेस यश आले नाही. त्यामुळे गंगाखेड पोलीसांच्या तपास कार्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

Web Title: Question mark on efficiency of Gangakhed police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.