पाऊस गायब; किडींचा वाढला प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:20 AM2021-08-15T04:20:26+5:302021-08-15T04:20:26+5:30
आता १६ व १७ ऑगस्ट रोजी पाऊस होईल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा ताणल्या गेल्या ...
आता १६ व १७ ऑगस्ट रोजी पाऊस होईल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा ताणल्या गेल्या आहेत. थोडा जरी पाऊस झाला तरी पिके जगतील. मात्र, पाऊस होत नसल्याने पिकांची स्थिती आणखीच नाजूक झाली आहे. याच कालावधीत जिल्ह्यातील बाष्प उत्सर्जनाचा वेग वाढला आहे. अशा परिस्थितीत कीडीचा प्रादुर्भाव अधिकच वाढतो. त्यामुळे सोयाबीनवर रसशोषण करणाऱ्या अळीचा, कापसावर काही भागात शेंदरी बोंड अळीचा, तर हळद पिकावर खोड माशीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. वाढलेल्या कीडीचे व्यवस्थापन करण्यात सध्या शेतकरी व्यस्त आहेत. त्याचप्रमाणे संरक्षित पाणी पाळी देऊन पिके जगविण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान, १६ व १७ ऑगस्ट रोजी वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आल्याने शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या आहेत.