परभणी, झरी परिसरात दोन तास पाऊस
By राजन मगरुळकर | Published: April 30, 2023 02:27 PM2023-04-30T14:27:17+5:302023-04-30T14:27:34+5:30
जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून पावसाची ग्रामीण भागात पावसाची हजेरी सुरु आहे.
परभणी : शहर परिसरात तसेच झरी येथे शनिवारी मध्यरात्री वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. यामध्ये झरी परिसरात रात्री सुमारे दोन तास पाऊस झाला. याशिवाय परभणी शहर परिसरात विजांच्या कडकडाटात एक ते दोन तास पावसाची संततधार सुरु होती. तसेच रविवारी दुपारी १५ ते २० मिनीटे परभणी शहर परिसरात मुसळधार पाऊस झाला. काही ठिकाणी गारांचा पाऊस झाल्याचे दिसून आले.
जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून पावसाची ग्रामीण भागात पावसाची हजेरी सुरु आहे. शनिवारी मध्यरात्री बारा ते चारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडासह पावसाने हजेरी लावली. शहर परिसरात झालेल्या पावसाने विविध ठिकाणी रस्ते जलमय झाले होते. याशिवाय विविध तालुक्यात सूध्दा या पावसाने हजेरी लावली. दरम्यान, या पावसाने शेत शिवारातील पिकांचे तसेच झाकून ठेवलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे.
मानोलीत वीज पडून दोन शेळ्यांचा मृत्यू
मानोली : मानवत तालुक्यातील मानोली येथे शनिवारी रात्री अवकाळी पाऊस झाला. त्यामध्य वैजनाथ रामकिसन तळेकर या शेतकऱ्याच्या दोन शेळ्यांचा रात्री दोनच्या सुमारास वीज पडून मृत्यू झाला.