परभणी जिल्ह्यात पाथरी, मानवत, जिंतूरमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 12:14 AM2019-06-08T00:14:47+5:302019-06-08T00:15:22+5:30
पाथरी, मानवत आणि जिंतूर तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी वादळी वाºयासह मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. वादळी वाºयाने ठिकठिकाणी केळी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : पाथरी, मानवत आणि जिंतूर तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी वादळी वाºयासह मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. वादळी वाºयाने ठिकठिकाणी केळी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात दोन दिवसांपासून वादळी वाºयाने नुकसान होत आहे. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास पाथरी तालुक्यात वादळी वाºयासह पावसाने हजेरी लावली. या वादळी वाºयामुळे मानवत रस्त्यावरील रत्नापूर गावाजवळ तीन झाडे रस्त्यावर आडवी पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. तालुक्यात मध्यम स्वरुपाचा पाऊसही झाला. मानवत तालुक्यातही रात्री ९ वाजेच्या सुमारास वादळी वाºयासह पाऊस झाला. वादळी वाºयामुळे कोल्हा येथील अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेली.
वीज पडून दोघे जखमी
४जिंतूर- तालुक्यातील गडदगव्हाण येथे वीज पडून दोघे जखमी झाल्याची घटना ७ जून रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली.
४शुक्रवारी जिंतूर तालुक्यात वादळी वाºयासह पाऊस झाला. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास प्रेमदास गोविंद आडे (५०), बिजूबाई सुभाष आडे (३५) हे शेतात काम करीत होते.
४अचानक वादळी वाºयासह पावसाला सुरुवात झाल्याने दोघेही शेतातील एका झाडाखाली थांबले होते. त्याच वेळी अचानक झाडावर वीज कोसळली. त्यात दोघेही जखमी झाले आहेत. प्रेमदास आडे व बिजूबाई आडे यांना उपचारासाठी परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.