जालना जिल्ह्याला पावसाचा फटका; चार मंडळात अतिवृष्टीची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 02:24 PM2020-07-21T14:24:29+5:302020-07-21T14:24:29+5:30
बदनापूर,जाफराबाद आणि अंबड तालुक्यातील मंडळात अतिवृष्टी
जालना : जिल्ह्यात मंगळवारी सकाळी ८ वाजण्यापूर्वीच्या २४ तासात ३०.४ मिमी पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यातील चार महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे.
बदनापूर तालुक्यातील बावणे पांगरी महसूल मंडळात ८० मिमी, जाफराबाद तालुक्यातील टें•ाुर्णी महसूल मंडळात ८० मिमी, जाफराबाद महसूल मंडळात ६८ मिमी व अंबड महसूल मंडळात ७६ मिमी पाऊस झाला आहे.
तालुकानिहाय पावसाची स्थिती पाहता जालना तालुक्यात २८.७५ मिमी, बदनापूर ३१.८० मिमी, भोकरदन ३२.१३ मिमी, जाफराबाद ४६.६० मिमी, परतूर ३१.४० मिमी, मंठा १५.५० मिमी, अंबड ३०.४३ मिमी व घनसावंगी तालुक्यात २३.७१ मिमी पाऊस झाला आहे.
जिल्ह्यातील इतरही काही महसूल मंडळात पावसाने समाधानकारक हजेरी लावली आहे. यामध्ये जालना महसूल मंडळात ४० मिमी, जालना ग्रामीण ४२ मिमी, विरेगाव ३८ मिमी, वाग्रूळ जहागीर ५० मिमी, बदनापूर ४३ मिमी, सिपोरा बाजार ५१ मिमी, पिंपळगाव रेणुकाई ४० मिमी, राजूर ४९ मिमी, केदारखेडा ४७ मिमी, अन्वा ३० मिमी, सातोना ४० मिमी, राणी उंचेगाव महसूल मंडळात ३० मिमी पाऊस झाला आहे. जिल्ह्यात जवळपास पंधरा दिवसानंतर झालेल्या समाधानकारक पावसामुळे शेतकºयांना मोठा दिलासा मिळाला आहे.