दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर परभणी जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 10:59 AM2020-06-19T10:59:44+5:302020-06-19T11:00:20+5:30
२४ तासांमध्ये जिल्ह्यात सरासरी ११.७१ मिमी पाऊस झाला आहे.
परभणी: दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर गुरुवारी रात्री जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन झाले असून, २४ तासांमध्ये जिल्ह्यात सरासरी ११.७१ मिमी पाऊस झाला आहे.
यावर्षीच्या पावसाळ्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या होत्या. मृग नक्षत्रातील थोड्या पावसावरही जिल्ह्यात पेरण्या सुरू झाल्या आहेत. मात्र दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकरी काहीसे चिंतेत होते.
गुरुवारी रात्री पावसाचे पुनरागमन झाले. पाथरी तालुक्यात २४.३३ मिमी, सोनपेठ २३ मिमी, परभणी ५.२५ मिमी, पालम १३ मिमी, पूर्णा १३.६०, सेलू १ मिमी आणि मानवत तालुक्यामध्ये १०.६७ मिलिमीटर असा जिल्हाभरात ११.७१ मिमी सरासरी पाऊस झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ११५.७० मिमी पावसाची नोंद झाली आहे.