शेतकऱ्यांच्या पैशांवर अंबानींचा दरोडा, राजू शेट्टी यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2018 05:26 AM2018-07-09T05:26:30+5:302018-07-09T05:27:06+5:30
कृषी आणि महसूल विभागातील अधिका-यांच्या साहाय्याने शेतक-यांकडून विम्यापोटी कोट्यवधी रुपये जमा करून त्यांना परतावा न देणा-या अनिल अंबानी यांनी शेतक-यांच्या पैशांवर दरोडा घातला आहे
परभणी - कृषी आणि महसूल विभागातील अधिका-यांच्या साहाय्याने शेतक-यांकडून विम्यापोटी कोट्यवधी रुपये जमा करून त्यांना परतावा न देणा-या अनिल अंबानी यांनी शेतक-यांच्या पैशांवर दरोडा घातला आहे, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा़ राजू शेट्टी यांनी येथे केला़
पीक विम्यापासून वंचित राहिलेल्या जिल्ह्यातील शेतकºयांनी अनिल अंबानी यांच्या रिलायन्स पीक विमा कंपनीविरूद्ध १३ दिवसांपासून आंदोलन उभे केले आहे़ शेट्टी यांनी रविवारी आंदोलकांची भेट घेतली़ शेतकºयांच्या पाठीशी असल्याचे सांगतानाच ते म्हणाले, पीक विम्या संदर्भात माझ्याकडे अनेक तक्रारी आल्या असून, पुराव्यासह मुख्यमंत्र्यांकडे तक्रारही नोंदविली आहे़ परंतु, मंत्री अंबानी यांच्या कार्पोरेट कंपनीसमोर गुडघे टेकत आहेत़ हा देश कार्पोरेट कंपनीला गहान ठेवल्याचा आरोपही त्यांनी केला़
कंपनीने ९ हजार ४१ कोटी रुपये विम्यापोटी जमा केले आणि परतावा मात्र केवळ ८१२ कोटी रुपयांचाच दिला आहे़ त्यामुळे ही योजना ‘अंबानी कल्याण योजना’ असल्याचेच दिसत आहे़ शेतकºयांवर तांत्रिक मुद्दे काढून गुन्हे दाखल केले जात आहेत़
चंद्रकांत पाटील यांचा इतिहास कच्चा
शेतकºयांच्या प्रश्नांवर आजपर्यंत मी अनेक आंदोलने यशस्वी केली आहेत़ परंतु, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचा इतिहास कच्चा असल्याने ते आपल्यावर टीका करीत आहेत, असे शेट्टी म्हणाले. ऊस आंदोलनावर राजू शेट्टी मोठे झाले़ आता हा प्रश्न राहिला नसल्याने दुधाचे आंदोलन केले जात आहे, अशी टीका पाटील यांनी केली होती़ त्यावर शेट्टी म्हणाले, ११ वर्षांपूर्वी मी दुधाचे आंदोलन उभारले होते़ मुंबईचा दुध पुरवठा बंद केला होता़ ठेकेदारांकडून कोण टक्केवारी घेतात? यासह बºयाच गोष्टी मलाही काढता येतात, असेही त्यांनी सांगितले.