राखी पौर्णिमेमुळे बसेसची संख्या वाढली; प्रवाशांचीही बसस्थानकात प्रवासासाठी गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:22 AM2021-08-21T04:22:25+5:302021-08-21T04:22:25+5:30
मागील दोन वर्षांपासून कधी सुरू तर कधी बंद असलेली बससेवा सध्या रुळावर आली आहे. मागील आठ दिवसांपासून एसटी बसस्थानकात ...
मागील दोन वर्षांपासून कधी सुरू तर कधी बंद असलेली बससेवा सध्या रुळावर आली आहे. मागील आठ दिवसांपासून एसटी बसस्थानकात प्रवाशांची वाढती गर्दी पाहून राखी पौर्णिमा सणाच्या पार्श्वभूमीवर महामंडळानेही बस फेऱ्यांची संख्या वाढवून प्रवाशांची सोय केली आहे.
विशेष म्हणजे मागील काही दिवसांच्या तुलनेत शुक्रवारी परभणी येथील बसस्थानकात केलेल्या पाहणीतून बसस्थानकात दिसून आले.
प्रवाशांची गर्दी
n एसटी महामंडळाच्या बससेवेला प्रतिसाद मिळत नसल्याने तोट्यात सुरू असलेली बससेवेला सध्या सुगीचे दिवस आले आहेत.
n राखी पौर्णिमा व अनलॉकच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची एसटी बसला गर्दी वाढल्याचे दिसून येत आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर १ जूनपासून जिल्ह्यात बससेवा सुरू झाली. मात्र ग्रामीण भागातील रद्द करण्यात आलेल्या फेऱ्या अद्यापही सुरू करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे विभागीय नियंत्रक कार्यालयाच्या वतीने याकडे लक्ष देवून बस फेऱ्या वाढव्यात, अशी मागणी होत आहे.