रामदास आठवले मृत सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांना भेटले, काय शब्द दिला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 21:02 IST2024-12-30T21:02:04+5:302024-12-30T21:02:44+5:30

शासन हे सूर्यवंशी कुटुंबीयांच्या पाठीशी असून त्यांना सर्वोतोपरी मदत केली जाईल, असा शब्द आठवले यांनी यावेळी दिला आहे.

Ramdas Athavale met the family members of deceased Somnath Suryavanshi | रामदास आठवले मृत सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांना भेटले, काय शब्द दिला?

रामदास आठवले मृत सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांना भेटले, काय शब्द दिला?

Ramdas Athvale: केंद्रीय सामाजिक न्याय  व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज  दिवंगत सोमनाथ सूर्यवंशी आणि आंबेडकरी चळवळीतील दिवंगत नेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. दोन्ही कुटुंबांना शासनाच्यावतीने निश्चितपणे मदत केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

रामदास आठवले यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांकडून त्यांची व्यथा जाणून घेतली. "परभणीत घडलेली घटना ही  दुर्दैवी आहे. या प्रकरणाची पारदर्शकपणे सखोल चौकशी व्हावी व दोषींवर कार्यवाई करण्यात यावी,  यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची  भेट घेणार आहोत. शासन हे सूर्यवंशी कुटुंबीयांच्या पाठीशी असून त्यांना सर्वोतोपरी मदत केली जाईल," असा शब्द आठवले यांनी यावेळी दिला आहे.
  

आंबेडकरी चळवळीतील दिवंगत नेते विजय वाकोडे  यांच्या कुटुंबियांची त्यांच्या राहुलनगर स्थित घरी जाऊन रामदास आठवले यांनी सांत्वनपर भेट घेतली. समाजासाठी तळमळीने काम करणारा एक चांगला लोकनेता जिल्ह्याने गमावला आहे. त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या स्मारकासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील, असे आठवले यांनी याप्रसंगी सांगितले.
 
दरम्यान, शासकीय विश्रामगृह येथे आयोजित बैठकीत रामदास आठवले यांनी  जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी आणि अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांच्याकडून घटनेचा व याप्रकरणी केलेल्या कार्यवाहीचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी  दत्तु शेवाळे उपस्थित होते.
 

Web Title: Ramdas Athavale met the family members of deceased Somnath Suryavanshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.