रणजीत पाटील यांनी विद्यापीठाकडे केला २१ लाखांचा भरणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:13 AM2021-06-18T04:13:30+5:302021-06-18T04:13:30+5:30

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कुलसचिव पदाचा पदभार घेतल्यानंतर रणजीत अण्णासाहेब पाटील यांनी २० ऑक्टोबर २०१८ पासून ...

Ranjit Patil paid Rs 21 lakh to the university | रणजीत पाटील यांनी विद्यापीठाकडे केला २१ लाखांचा भरणा

रणजीत पाटील यांनी विद्यापीठाकडे केला २१ लाखांचा भरणा

Next

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कुलसचिव पदाचा पदभार घेतल्यानंतर रणजीत अण्णासाहेब पाटील यांनी २० ऑक्टोबर २०१८ पासून त्यांना लागू नसलेली ३७४००-६७०००, ग्रेड वेतन ८७०० ही वरिष्ठ वेतनश्रेणी घेतल्याची बाब तक्रारीनंतर समोर आली होती. त्यानंतर विद्यापीठाच्या नियंत्रकांनी पाटील यांना जास्तीची उचललेली २१ लाख ४ हजार २९५ रुपयांची रक्कम तातडीने चलनाद्वारे शासन खाती जमा करण्याचे आदेश ११ जून रोजी दिले होते. त्यामुळे विद्यापीठात खळबळ उडली होती. नोटीस मिळाल्यानंतर कुलसचिव पाटील यांनी १५ जून रोजी चलनाद्वारे २१ लाख ४ हजार २९५ रुपयांची रक्कम शासनाच्या खात्यावर जमा केल्याची माहिती विद्यापीठातील उपनियंत्रक उबाळे यांनी दिली. त्यामुळे पाटील यांनी जास्तीची घेतलेली रक्कम शासन खाती जमा करून चूक कबूल केली आहे. त्यामुळे शासनाची एक प्रकारे फसवणूक झाली आहे. याप्रकरणी विद्यापीठ प्रशासन काय कारवाई करते, याकडे मराठवाड्याचे लक्ष लागले आहे. याबाबत प्रतिक्रियेसाठी कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा मोबाइल बंद होता.

पाटील यांची बदली

कुलसचिव रणजीत अण्णासाहेब पाटील यांची कृषी विद्यापीठातून परभणी महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त या पदावर बदली झाली आहे. कृषी विद्यापीठातील जास्तीची घेतलेली रक्कम शासन खाती त्यांनी जमा केल्यानंतर कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी त्यांना १५ जून रोजी कार्यमुक्त केले. त्यानंतर त्यांनी गुरुवारपर्यंत परभणी मनपाचा पदभार घेतला नव्हता.

Web Title: Ranjit Patil paid Rs 21 lakh to the university

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.