दुष्काळी उपयायोजना सुरु करण्याच्या मागणीसाठी भाकपचा पाथरीत रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 04:26 PM2019-01-15T16:26:48+5:302019-01-15T16:28:42+5:30

उपाययोजना तातडीने राबवाव्यात अशी मागणी करत आंदोलकांनी सेलू चौकात रास्तारोको केला.

rastaroko of BHAKAP in Pathari,demanding drought relief scheme for taluka | दुष्काळी उपयायोजना सुरु करण्याच्या मागणीसाठी भाकपचा पाथरीत रास्ता रोको

दुष्काळी उपयायोजना सुरु करण्याच्या मागणीसाठी भाकपचा पाथरीत रास्ता रोको

Next

पाथरी (परभणी ) : ऊसाला एक रक्कमी एफ.आर.पी.प्रमाणे भाव देण्यात यावा, रोहयोची कामे तत्काळ सुरु करावीत या प्रमुख मागण्यासह इतर मागण्यांसाठी भाकपाच्यावतीने आज सेलु चौकात दुपारी १२ वाजता एक तास रास्ता रोको आदोलन केले. 

तालुका दुष्काळग्रस्त असून त्यावर शासनाने उपाय योजना राबविल्या नाहीत. त्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात अशी मागणी करत आंदोलकांनी सेलू चौकात रास्तारोको केला. यानंतर तहसीलदार भाग्यश्री देशमुख यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात जनावरांसाठी तात्काळ चारा छावण्या सुरु कराव्यात, जायकवाडी धरणातून डाव्या कालव्याला पाणी पाळी देण्यात यावी, शेतकऱ्यांना पिक कर्जाचे वाटप करण्यात यावे, मुद्रा योजनेची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी, कर्जमाफी पासून वचित शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ द्मावा, खाजगी फायनान्सच्या वसुलीला स्थगिती द्यावी, महिला बचत गटांना कर्जाचे वाटप करा, पिक विमा तात्काळ द्यावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. 

निवेदनावर ज्ञानेश्वर काळे, नवनाथ कोल्हे, श्रीनिवास वाकनकर, बालासाहेब हारकळ, कल्याण आमले, नाथा रोडे, भारत फुके, सभाजी लिपने, विजयसिंह कोल्हे, तुकाराम शिदे, शेख अनिस, सदीप काकडे यांच्या स्वाक्षरी आहेत.

Web Title: rastaroko of BHAKAP in Pathari,demanding drought relief scheme for taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.