परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर रेशन दुकानदारांचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 12:10 AM2018-02-22T00:10:29+5:302018-02-22T00:10:51+5:30
तामिळनाडू शासनाप्रमाणे अन्न महामंडळ स्थापन करून परवानाधारक रेशनदुकानदारांना त्यात समाविष्ट करावे व शासकीय सुविधा द्याव्यात, यासह इतर मागण्यांसाठी जिल्ह्यातील रेशनदुकानदारांनी २१ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : तामिळनाडू शासनाप्रमाणे अन्न महामंडळ स्थापन करून परवानाधारक रेशनदुकानदारांना त्यात समाविष्ट करावे व शासकीय सुविधा द्याव्यात, यासह इतर मागण्यांसाठी जिल्ह्यातील रेशनदुकानदारांनी २१ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला़
परभणी जिल्हा रास्तभाव धान्य दुकानदार व हॉकर्स, किरकोळ केरोसीन परवानाधारक संघटनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले़ बुधवारी दुपारी १़३० वाजण्याच्या सुमारास जिल्ह्यातील रेशनदुकानदारांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढला़ रेशनदुकानदारांचे प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत़ ई-पॉस मशीनद्वारे धान्य वितरण करताना अडचणी येत आहेत़ या सर्व मुद्यांवर मोर्चाद्वारे आवाज उठविण्यात आला़ मोर्चानंतर जिल्हाधिकाºयांना १७ मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले़ त्यात परवानाधारकास महागाई निर्देशाकांनुसार मानधन किंवा पगार द्यावा, शालेय पोषण आहाराची वाहतूक व कमीशनची रक्कम अनेक वर्षांपासून थकली आहे़ ती अदा करावी, परवानाधारकांनी धान्यासाठी रक्कम भरली; परंतु, धान्य कोटा उपलब्ध न झाल्याने ही रक्कम शासनाकडे थकीत आहे़ ती त्वरित द्यावी, परवानाधारकांचे पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्न करावेत यासह इतर मागण्यांचा यात समावेश आहे़ या आंदोलनात जिल्ह्यातील रेशनदुकानदार, केरोसीन परवानाधारक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़