दिवसभरात ३४ बाधितांची नोंद; एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:18 AM2020-12-06T04:18:38+5:302020-12-06T04:18:38+5:30
परभणी शहरासह तालुक्यात १६, तर मानवत शहर व तालुक्यात ४, सेलू शहर व तालुक्यात ६, पूर्णा तालुक्यात ३, सोनपेठ ...
परभणी शहरासह तालुक्यात १६, तर मानवत शहर व तालुक्यात ४, सेलू शहर व तालुक्यात ६, पूर्णा तालुक्यात ३, सोनपेठ शहर व तालुक्यात ३, जिंतूर तालुक्यात १ व हिंगोली जिल्ह्यातील करंजी येथील एक व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आली. शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका व्यक्तीचा शनिवारी मृत्यू झाला. २३ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत ७ हजार २५० कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, त्यातील ६ हजार ७९४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत २९० जणांचा मृत्यू झाला. १६६ जण आरोग्य संस्थांमध्ये उपचार घेत आहेत.
येथे आढळले रुग्ण
परभणी शहरातील वांगी रोड, ज्ञानेश्वरनगर, संगम कॉलनी, एकता कॉलनी, मातोश्रीनगर, गणेशनगर, जिजाऊनगर, तालुक्यातील कौडगाव, सायाळा, मानवतमधील आंबेडकरनगर, पेठ मोहल्ला, शिवाजीनगर, गजानननगर, सेलूतील केशवराज नगर, चिकलठाणा, साळेगाव, पूर्णा तालुक्यातील भाटेगाव, हिवरा, शहरातील अलंकारनगर, सोनपेठ येथील मारवाड गल्ली, मेन रोड, शेळगाव, जिंतूर तालुक्यातील इटोली येथील रुग्णांचा समावेश आहे.