परभणीत प्रशासनाला दिले निवेदन:संविधानाची प्रत जाळणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 12:32 AM2018-08-11T00:32:11+5:302018-08-11T00:32:44+5:30

भारतीय संविधानाची प्रत जाळणाºया व्यक्तींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आंबेडकरी चळवळीतील विविध संघटना, कार्यकर्त्यांनी शुक्रवारी पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Report given to Parbhani administration: File a criminal case against those who burn the Constitution | परभणीत प्रशासनाला दिले निवेदन:संविधानाची प्रत जाळणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा

परभणीत प्रशासनाला दिले निवेदन:संविधानाची प्रत जाळणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी: भारतीय संविधानाची प्रत जाळणाºया व्यक्तींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आंबेडकरी चळवळीतील विविध संघटना, कार्यकर्त्यांनी शुक्रवारी पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यासंदर्भात देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नवी दिल्ली येथे जंतर-मंतर या ठिकाणी काही समाजकंटकांनी भारतीय संविधानाची प्रत जाळून राष्ट्राचा अपमान केला आहे. तसेच भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अपशब्द वापरले आहेत. या संदर्भातील व्हिडिओ व छायाचित्र समाज माध्यमांमध्ये प्रसारित करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधितांविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर पवनकुमार शिंदे, विकास मालसमिंदर, कैलास लहाने, धीरज कांबळे, बाबलेश कसारे, विनय लहाने, सिद्धांत पगारे, सोनू सोनवणे, अक्षय डाके, विशाल डंबाळे, भारत भराडे, आकाश लहाने, अमोल गायकवाड, सुधीर कांबळे, संजय सारणीकर, अशिष वाकोडे, महेंद्र गाडेकर, हर्षवर्धन काळे, कपील पैठणे, पवन कुरवाडे, सुमेध भराडे, सोनु भालेराव, विजय शेळके, ऋषी आवचार आदीसह गौतमनगर भागातील नागरिकांची नावे आहेत.
दरम्यान, या संदर्भात भीमनगर भागातील नागरिकांनीही पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले असून त्यामध्ये संबंधित समाजकंटकाविरुद्ध देशद्रोह व अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर उत्तम गायकवाड, अविनाश आवचार, मिलिंद लजडे, आकाश कनकुटे, बंडू पारवे, अजय ढाले, अतिष हातागळे, कैलास गालफाडे, मनोज धूतमल, योगेश पंडित, महेंद्र धबाले, गणेश बारवकर आदींची नावे आहेत.
या प्रकरणात भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनेही प्रशासनामार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये भारतीय संविधानाची प्रत जाळण्याची अत्यंत संतापजनक घटना आहे. त्यामुळे या प्रकरणात संबंधिताविरुद्ध त्वरित देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर सतीश भिसे, अर्जून पंडित, चंद्रकांत जोंधळे, नितीन सावंत, कचरु गोडबोले, प्रेमानंद बनसोडे, संजय बनसोडे, बंडू पारवे, तातेराव वाकळे, बबन वाहुळे, महेंद्र सानके, राम मुंढे, रवि खंदारे, आनंद तुपसमिंदर आदींच्या स्वाक्षºया आहेत.
मानवतमध्ये आंबेडकरी संघटनांच्या वतीने १० आॅगस्ट रोजी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर संपत पंडित, चंद्र्र्रकांत मगर, दीपक ठेंगे, विजय खरात, शुभम पंचागे, विजय धबडगे, अर्जून झिंझुर्डे, रवि पंडित, नागसेन भदर्गे, अफरोज लाला, कार्तिक मुजमुले, आदर्श धबडगे आदींची नावे आहेत.

Web Title: Report given to Parbhani administration: File a criminal case against those who burn the Constitution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.