जिल्ह्यात ५९२ नागरीकांचे अहवाल अनिर्णायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:18 AM2021-03-10T04:18:45+5:302021-03-10T04:18:45+5:30
जिल्ह्यात दीड हजार हजार खाटा रिक्त परभणी : कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी खाजगी आणि शासकीय रुग्णालयात १ हजार ९१८ ...
जिल्ह्यात दीड हजार हजार खाटा रिक्त
परभणी : कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी खाजगी आणि शासकीय रुग्णालयात १ हजार ९१८ खाटा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. मात्र मागील काही महिन्यांपासून होम आयसोलेशनमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असल्याने शासकीय व खाजगी रुग्णालयांमध्ये रुग्ण संख्या रोडावली आहे. परिणामी सद्यस्थितीला १ हजार ५८३ खाटा रिक्त असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
दिवसभरात ७७९ नागरिकांची चाचणी
परभणी : कोरोनाचे रुग्ण शोधण्यासाठी आरोग्य विभागाने आरटीपीसीआर चाचण्या वाढविल्या आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपजिल्हा रुग्णालयातही आता या चाचण्या होऊ लागल्या आहेत. मंगळवारी जिल्हा रुग्णालयात ४४, आयटीआय रुग्णालयात ४९, अस्थिव्यंग रुग्णालयात ७, परभणी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये १२, गंगाखेड तालुक्यात ९२, पालम तालुक्यात १६, सोनपेठ १३४, सेलू २२७ आणि जिंतूर तालुक्यात १४१ नागरिकांचे स्वॅब नमुने घेण्यात आले आहेत.