परभणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : पत्रकारांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 12:22 AM2018-03-20T00:22:59+5:302018-03-20T00:22:59+5:30
दहावीची प्रश्नपत्रिका फुटल्याची बातमी प्रसिद्ध केल्या प्रकरणी शिक्षण विभागाने पत्रकारांवरच गुन्हे दाखल करण्याचा प्रकार लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर घाला घालण्यासारखा असून, या पत्रकारांवर दाखल केलेले खोटे गुन्हे परत घ्यावेत, अशी मागणी येथील पत्रकारांनी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : दहावीची प्रश्नपत्रिका फुटल्याची बातमी प्रसिद्ध केल्या प्रकरणी शिक्षण विभागाने पत्रकारांवरच गुन्हे दाखल करण्याचा प्रकार लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर घाला घालण्यासारखा असून, या पत्रकारांवर दाखल केलेले खोटे गुन्हे परत घ्यावेत, अशी मागणी येथील पत्रकारांनी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे़
१४ मार्च रोजी परभणी जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेतील विज्ञान व तंत्रज्ञान विषयाची प्रश्नपत्रिका व्हॉटस्अॅपवरून व्हायरल झाली होती़ अनेकांच्या मोबाईलवर परीक्षेपूर्वीच प्रश्नपत्रिकेच्या पोस्ट फिरत होत्या़ याबाबत पत्रकारांनी व्हायरल झालेली प्रश्नपत्रिका पेपर संपल्यानंतर पडताळून पाहिली असता ती तंतोतंत जुळली़ या संदर्भात माध्यमिक शिक्षणाधिकाºयांशीही संवाद साधला़ त्यानंतर शिक्षणाधिकाºयांच्या प्रतिक्रियेसह १५ मार्च २०१८ रोजी ‘लोकमत’ व अन्य एका वृत्तपत्रात सविस्तर वृत्त प्रकाशित करण्यात आले़ मात्र शिक्षण विभागाने नवा मोंढा पोलीस ठाण्यात ‘लोकमत’ व अन्य एका वृत्तपत्राविरूद्धच गुन्हा दाखल केला आहे़ शहनिशा न करता बातमी छापली व शिक्षण विभागाला याबाबत माहिती उपलब्ध करून दिली नाही, म्हणून हा गुन्हा दाखल करण्यात आला़ हा प्रकार म्हणजे चाललेला गैरप्रकार माध्यमांनी उघडकीस आणू नये म्हणून प्रयत्न केल्याचे दिसते़ वास्तविक संबंधित दैनिकांच्या प्रतिनिधींनी संपूर्ण शहनिशा करूनच वृत्त प्रसिद्ध केले, असे असतानाही बातमी छापली म्हणून गुन्हा दाखल करणे म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर घाला घालण्यासारखे आहे़ जिल्ह्यात कॉप्यांचा सुळसुळाट आहे़ अनेक केंद्रांवर मोठे गैरप्रकार होत आहेत़ प्रश्नपत्रिका व्हायरल होत आहे़ कालच वर्धा येथील पेपर फुटी प्रकरणी संशयित आरोपी म्हणून परभणी येथीलच आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे़ हे सर्व होत असताना प्रसार माध्यमांनी डोळे झाकून काम करावे, असे गैरकृत्य उघडकीस आणू नये, असेच संबधितांना वाटत असल्याचाही आरोप पत्रकारांनी केला आहे़ दरम्यान, या प्रकरणी पत्रकारांवर दाखल झालेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत व कॉपी प्रकरणी डोळेझाक करणाºया शिक्षण विभागातील अधिकाºयांवर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा पत्रकारांनी दिला आहे़ निवेदनावर पत्रकार दिलीप माने, हनुमंत चिटणीस, हमीद मलिक, प्रा़ सुरेश नाईकवाडे, अनिल दाभाडकर, नजीर पठाण, सुरेंद्र पाथरीकर, लक्ष्मण मानोलीकर, नरहरी चौधरी, शेख सलीम, बालासाहेब काळे, विजय कुलकर्णी, प्रभू दीपके, शेख इफ्तेखार, विष्णू सायगुंडे, विशाल माने, गजानन निशाणकर, उत्तम बोरसुरीकर आदींच्या आहेत़
तालुका पत्रकार संघ सोनपेठ
सोनपेठ तालुका पत्रकार संघाच्या वतीने तहसीलदार जीवराज डापकर यांना निवेदन देण्यात आले आहे़ पत्रकारांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली़ निवेदनावर गणेश पाटील, कृष्णा पिंगळे, शिवमल्हार वाघे, खदीर विटेकर, सुधीर बिंदू, सुग्रीव दाढेल, बाबासाहेब गर्जे, राधेश्याम वर्मा, मंजूर मुल्ला, गजानन चिकणे, सिद्धेश्वर गिरी, प्रा़ डॉ़ संतोष रणखांब, रविंद्र देशमुख, राजेश्वर खेडकर, भागवत पोपडे, शिवाजी कुंभारीकर, देवानंद सौंदळे, मल्लिकार्जुन सौंदळे, सुनील गायकवाड, गोविंद नाईक आदींची नावे आहेत़
पत्रकार संघ, पालम
पालम येथेही तालुका पत्रकार संघाच्या वतीने तहसीलदार श्रीरंग कदम यांना निवेदन देण्यात आले़ पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल केल्याबद्दल निषेध व्यक्त करीत हे गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी करण्यात आली़ यावेळी माधव गायकवाड, शांतीलाल शर्मा, लक्ष्मण दुधाटे, भगवान करंजे, धोंडीराम कळंबे, मारोती नाईकवाडे, नवनाथ हत्तीअंबिरे, सदानंद हत्तीअंबिरे, भगवान सिरसकर, चंद्रकांत गायकवाड आदींची उपस्थिती होती़