प्रजासत्ताक दिनी गोंधळ दोन हजारांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:14 AM2021-06-25T04:14:22+5:302021-06-25T04:14:22+5:30
जिंतूर शहरातील जिल्हा परिषदेच्या मैदानावर १६ जानेवारी २०१७ रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम सुरू असताना आरोपी शेख वकील शेख ...
जिंतूर शहरातील जिल्हा परिषदेच्या मैदानावर १६ जानेवारी २०१७ रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम सुरू असताना आरोपी शेख वकील शेख गनी याने आरडाओरड करून गोंधळ घातला. बॅरिकेट्स ओलांडून आत प्रवेश केला तसेच पोलीस कर्मचारी दत्ता कानगुले यांना धक्काबुक्की करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. तपास अधिकारी यु. एस. सावंत यांनी दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. हे प्रकरण सत्र न्यायाधीश ओंकार देशमुख यांच्यासमोर चालविण्यात आले. साक्षी पुरावे अंती आरोपी शेख वकील शेख गनी यास दोन वर्षाच्या चांगल्या वागणुकीचा हमीपत्रासह २ हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. या प्रकरणात जिल्हा सरकारी वकील डी. यु. दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक सरकारी वकील नितीन खळीकर यांनी शासनाची बाजू मांडली. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून सहायक पोलीस उपनिरीक्षक सुरेश चव्हाण व एच.डी. भांगे यांनी काम पाहिले.