आरक्षण फुल्ल; तरीही ‘शिवशाही’ रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 11:57 PM2018-03-05T23:57:25+5:302018-03-05T23:57:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क परभणी : दोन महिन्यांपूर्वी मोठा गाजावाजा करुन सुरू केलेल्या ‘शिवशाही’ या वातानुकूलित लकझरी बसचे आरक्षण फुल्ल ...
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : दोन महिन्यांपूर्वी मोठा गाजावाजा करुन सुरू केलेल्या ‘शिवशाही’ या वातानुकूलित लकझरी बसचे आरक्षण फुल्ल झाले असतानाही प्रवाशांना वाºयावर सोडून खाजगी प्रासंगिक करारासाठी ही बस पाठविल्याचा प्रकार रविवारी रात्री १० च्या सुमारास परभणी बसस्थानकावर घडला़ एसटी महामंडळाच्या या अवसानघातकी निर्णयामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी गोंधळ घातल्यानंतर त्यांना निमआराम बसद्वारे पुण्याला पाठविण्याची व्यवस्था स्थानिक अधिकाºयांना करावी लागली़
एसटीचा प्रवास सुखकर करण्यासाठी महामंडळाने दोन महिन्यांपूर्वी शिवशाही बससेवा सुरू केली आहे़ या सेवेंतर्गत परभणी आगाराला ४ बसेस प्राप्त झाल्या असून, या बस गाड्या परभणी ते पुणे या मार्गावर चालविल्या जात आहेत़ वातानुकूलित, एअर सस्पेंशन आणि आरामदायक आसन व्यवस्थेमुळे खाजगी ट्रॅव्हल्सला स्पर्धा करण्यासाठी महामंडळाने ही बससेवा सुरू केली खरी; परंतु, त्यातील गोंधळाच्या स्थितीमुळे प्रवाशांची मात्र मोठी गैरसोय झाल्याचे दिसून आले़
रविवारी अनेक प्रवाशांनी परभणी ते पुणे या प्रवासासाठी शिवशाही बससेवेची आॅनलाईन आरक्षण नोंदणी केली़ ४१ प्रवाशांनी हे आरक्षण केले होते़ त्यामुळे आरक्षणानुसार ४ मार्च रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास प्रवासी बसस्थानकात दाखल झाले़ ९़३० वाजेपर्यंत शिवशाही बस स्थानकात आली नाही़ त्यामुळे प्रवाशांची चलबिचल सुरू झाली़ चौकशी कक्षात विचारणा करण्यात आली़ परंतु, प्रवाशांना समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत़
विशेष बाब म्हणजे याच दरम्यान, बसस्थानकाच्या आवारातूनच अनेक खाजगी बसेस पुण्याकडे निघून गेल्या़ परंतु, महामंडळाची शिवशाही बस स्थानकात दाखल झाली नाही़ त्यामुळे प्रवाशांमध्ये संताप व्यक्त केला जात होता़ रात्री १० वाजण्याच्या सुमारास ही बस रद्द झाल्याचे सांगण्यात आले़ स्थानकात अधिकारी उपस्थित नव्हते़ त्यामुळे कर्मचाºयांनी आरक्षण केलेल्या तिकीटाचे पैसे परत करण्यासही नकार दिला़ तिकीट काढूनही पुण्यासाठी बससेवा उपलब्ध नसल्याने हा गोंधळ अधिकच वाढला़ या ठिकाणी प्रवाशांचे समाधान करण्यासाठी कोणीही पुढे येत नव्हते़ त्यामुळे प्रवाशांनी एकच गोंधळ केला. अखेर रात्री १०़३० वाजेच्या सुमारास या प्रवाशांना निमआराम बस उपलब्ध करून देण्यात आली आणि या बसमधून ४१ पैकी ३९ प्रवाशांचा पुण्याचा प्रवास सुरू झाला तर दोन प्रवाशांना साध्या बसमधून पुण्याकडे पाठविण्यात आले़ चांगली सेवा मिळेल या आशेने प्रवाशांनी शिवशाही बसचे बुकींग केले खरे़ परंतु, महामंडळातील प्रशासकीय गोंधळामुळे प्रवाशांना मानसिक त्रास सहन करावा लागला़ तसेच शिवशाही बसचे तिकीट काढल्यानंतरही निमआराम बसमधून प्रवास केल्याने आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागला़ त्यामुळे महामंडळाच्या ढिसाळ कारभाराचे पितळ उघडे पडले आहे.
शिवशाही बस प्रासंगिक करारासाठी
एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सेवेसाठी शिवशाही बससेवा सुरू केली आहे़ परभणी आगाराला ४ बस गाड्या उपलब्ध झाल्या असून, त्यातील तीन बसगाड्या प्रासंगिक करारासाठी देण्यात आल्या़ प्रवाशांच्या सोयीसाठी असलेल्या या बसेस प्रासंगिक करारासाठी कशा काय वापरल्या? असा सवाल आता उपस्थित होत आहे़ प्रासंगिक करार केलेल्या तीन गाड्यांपैकी एका गाडीचा प्रासंगिक करार रद्द करण्यात आला़ मात्र ही गाडी नादुरुस्त झाल्याने कार्यशाळेतच उभी होती़
कर्मचाºयांचा हलगर्जीपणा भोवला
परभणी आगारातून सुरू केलेल्या शिवशाही बससेवेचे तिकीट बुकींग आॅनलाईन करण्याची सुविधा उपलब्ध आहे़ आगाराकडे ४ शिवशाही बसेस उपलब्ध आहेत़ त्यापैकी एक गाडी ४ मार्च रोजी उपलब्ध होईल, अशा अपेक्षेने कर्मचाºयांनी आॅनलाईन संकेतस्थळावर गाडी उपलब्ध असल्याची नोंद घेतली आणि त्यामुळे प्रवाशांनी आरक्षण केले़ परंतु, ऐनवेळी एकही गाडी उपलब्ध झाली नाही़
त्यामुळे प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागले़ प्रवाशांच्या मानसिक त्रासाला जबाबदार असणाºया कर्मचाºयांवर प्रशासनाने कारवाई करावी़ जेणे करून यापुढे अशा चूका होणार नाहीत़, अशी अपेक्षा प्रवाशांमधून व्यक्त होत आहे़