कायदेविषयक शिबिरास प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:16 AM2021-03-19T04:16:49+5:302021-03-19T04:16:49+5:30
ग्रामस्थांनी आपापसातील वाद गावातच सामोपचाराने मिटवावेत, असे सांगून ज्येष्ठांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा, असे न्यायाधीश चव्हाण यांनी यावेळी नमूद ...
ग्रामस्थांनी आपापसातील वाद गावातच सामोपचाराने मिटवावेत, असे सांगून ज्येष्ठांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा, असे न्यायाधीश चव्हाण यांनी यावेळी नमूद केले. ॲड. विष्णू ढोले यांनी विविध कायदेविषयक बाबींची माहिती दिली. जन्मापासून मृत्यूपर्यंत विविध टप्प्यांवर कायद्याची गरज प्रत्येकाला भासत असते. त्यादृष्टीने विविध कायद्यांची व हक्कांची माहिती सर्वांना असली पाहिजे, असे ॲड. ढोले यांनी सांगितले. सूत्रसंचालन ॲड. महेश वाडेकर यांनी केले. यावेळी वकील संघाच्या उपाध्यक्षा ॲड. सुनीता ढोले, सचिव ॲड. मुकुंद गजमल, कोषाध्यक्ष ॲड. गोपाल बोकन, ॲड. टी. ए. चव्हाण, ॲड. दीपक भुक्तर, ॲड. महादेव चट्टे, ॲड. गिरीष साडेगावकर, ॲड. प्रभाकर गिराम, ॲड. गौतम चौबी, ॲड. रोहिणी बोराडे, ॲड. राधा सुतार, पोलीस शिपाई रवी मगरे, पौळ, जाधव आदींची उपस्थिती होती. शिबिराच्या यशस्वीतेसाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला.