परभणीत जिजाऊ जयंतीनिमित्त मॅरेथॉन स्पर्धेला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 12:38 AM2019-01-13T00:38:53+5:302019-01-13T00:39:07+5:30
राष्ट्रमाता मॉं जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त परभणीत आयोजित राज्यस्तरीय महिला मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शनिवारी सकाळी ८ वाजता ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या मैदानापासून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : राष्ट्रमाता मॉं जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त परभणीत आयोजित राज्यस्तरीय महिला मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शनिवारी सकाळी ८ वाजता ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या मैदानापासून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली.
तहसीलदार विद्याचरण कडवकर, जया जाधव, राधा कडवकर, प्रा.नितीन लोहट, सुभाष जावळे, प्रा.प्रल्हाद मोरे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या स्पर्धेला प्रारंभ झाला. त्यानंतर सकाळी १० वाजता वसमत रोडवरील जिजाऊ मंदिर येथे राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. याच ठिकाणी मॅरेथॉन स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. या कार्यक्रमास तहसीलदार विद्याचरण कडवकर, अच्युत महाराज दस्तापूरकर, पुरुषोत्तम महाराज, उपविभागीय अधिकारी डॉ.सुचिता शिंदे, जिल्हा कोषागार अधिकारी ज्योती बगाटे, महिला व बालविकास अधिकारी रुपाली रंगारी, सुभाष जावळे, रसिका ढगे, आशा पाटील, नंदा कुºहे, डॉ. जगन सरकटे, रामभाऊ घाटगे, मेघना बोर्डीकर, धोंडीराम चव्हाण आदींची उपस्थिती होती.
आर.के. भालेराव यांनी प्रास्ताविक केले. नवनाथ जाधव यांनी सूत्रसंचालन केले. बाळासाहेब यादव यांनी आभार मानले.
या कार्यक्रमानंतर रांगोळी, चित्रकला स्पर्धेसह नृत्य व विविध कला गुणदर्शनाचा कार्यक्रम पार पडला. सायंकाळी गाऊ जिजाऊस आम्ही हा संगीतमय कार्यक्रम डॉ. अशोक जोंधळे, आशा जोंधळे व संचाने सादर केला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी माणिक मोहिते, नरहरी वाघ, सुनील जाधव, एकनाथ मस्के, दिनकर गरुड, अंगद जावळे, माऊली दुधाटे, अशोक रसाळ, सुशील देशमुख, बालाजी मोहते, गजानन जोगदंड आदींनी परिश्रम घेतले.