विश्रामग्रह प्रवाशांसाठी खुले करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:31 AM2021-03-13T04:31:34+5:302021-03-13T04:31:34+5:30

रस्त्याचे काम करण्याची मागणी मानवत: शहरातील गजानन महाराज मंदिर ते शासकीय विश्राम गृहापर्यंत असलेल्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, ...

The resting place should be open for travelers | विश्रामग्रह प्रवाशांसाठी खुले करावे

विश्रामग्रह प्रवाशांसाठी खुले करावे

Next

रस्त्याचे काम करण्याची मागणी

मानवत: शहरातील गजानन महाराज मंदिर ते शासकीय विश्राम गृहापर्यंत असलेल्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, यामुळे वाहन चालकांना वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे, तसेच खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने छोट्या मोठ्या अपघाताची संख्या वाढली आहे. रस्त्याचे काम तातडीने करावे, अशी मागणी वाढली आहे.

खड्डे बुजविण्याची मागणी

मानवत: शहरातील गजानन महाराज मंदिर ते शासकीय विश्राम गृहापर्यंत असलेल्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, यामुळे वाहन चालकांना वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे, तसेच खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने छोट्या मोठ्या अपघाताची संख्या वाढली आहे. रस्त्याचे काम तातडीने करावे, अशी मागणी वाढली आहे.

वाहतूक पोलीस नियुक्त करण्याची मागणी

मानवत: शहरातील मार्केट परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडियाचे शाखेसमोर वाहने अस्तव्यस्त लावण्यात येत असल्याने या ठिकाणी वाहतूककोंडी नित्याची झाली आहे. बँक प्रशासनाने पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून द्यावी व या ठिकाणी वाहतूककोंडी होऊ नये, यासाठी कायमस्वरूपी दोन वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी, अशी मागणी होत आहे.

दुधना नदीपात्रातून अवैध वाळू उपसा

सेलू : तालुक्यात वाळू माफिया पुन्हा सक्रिय झाले असून, दुधना नदी पात्रातून दिवस-रात्र अवैध वाळूचा उपसा केला जात आहे. ट्रॅक्टरमधून सर्रास या वाळूची वाहतूक केली जात असून, यातून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. वाळूला सोन्याचे भाव आल्याने वाळू माफिया मालामाल होत आहेत.

मुख्य रस्त्यांच्या पूर्णत्वाच्या आशा

परभणी : गेल्या अनेक वर्षांपासून चांगल्या रस्त्याकडे डोळे लावून बसलेल्या परभणीकरांना या वर्षात तरी जिंतूर, गंगाखेड, मानवत रोड ते झीरो फाटा या प्रमुख तीन रस्त्यांच्या पूर्णत्वाची आशा लागली आहे. राज्यस्तरावर चर्चेत आलेल्या परभणी-गंगाखेड व परभणी-जिंतूर या रस्त्याच्या कामासाठी १७ एप्रिल, २०१८ रोजी केंद्रीय दळणवळणमंत्री नितिन गडकरी यांनी निधीची घोषणा केली होती. त्यात परभणी गंगाखेड रस्त्यासाठी २०२ कोटी रुपये, तर परभणी जिंतूर रस्त्यासाठी २१२ कोटी रुपयांचा समावेश होता. सध्या हे रस्ते परभणीकरांना पूर्णत्वाकडे जाताना दिसत आहेत.

भौतिक सुविधा वाढविण्याची मागणी

परभणी : खिळखिळ्या झालेल्या जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेच्या समोर अनेक आव्हाने आहेत. मात्र, या यंत्रणेला सक्षम करण्यासाठी आतापर्यंत फारसे प्रयत्न झाले नाहीत. कोरोनाच्या संकटाने या यंत्रणेचा पांगूळपणा उघडा पडला. त्यामुळे भविष्यात अशा संकल्पना वाढविल्या, तर आरोग्य यंत्रणा सक्षम राहावे, यासाठी मनुष्यबळ भरती, भौतिक सुविधा वाढविण्यासाठी प्रशासनाला प्रयत्न करावे लागणार आहेत.

पुरातन वारशाला मिळणार झळाळी

परभणी : अकराव्या शतकातील चालुक्य काळात उभारलेल्या या जिल्ह्यातील पुरातन मंदिराचा पुनरुज्जीवनासाठी सुरू झालेल्या लोक चळवळीला आता प्रशासनाची साथ मिळाली आहे. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे या पुरातन वर्षाला नव्या वर्षात नवी झळाळी मिळेल. जुन्या मंदिराचा संवर्धनाबरोबरच हा पुरातन वारसा नव्याने पुढील पिढीसमोर मांडला जाणार आहे.

मानवत रोड ते परळी रेल्वे मार्गाचे सोनपेठकरांना प्रतीक्षा

सोनपेठ : तालुक्यातसह परिसरातील इतर तालुक्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या मानवत रोड- पाथरी- सोनपेठ- परळी हा रेल्वे मार्ग गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. हा मार्ग अस्तित्वात आल्यानंतर जिल्ह्यातील तीन तालुक्यांतील प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला मानवत रोड-परभणी लोहमार्ग व्हावा, यासाठी लोकप्रतिनिधी, संघटना, प्रवासी व नागरिकांनी पाठपुरावा केला आहे.

जिल्हाप्रशासनाने कारवाई करण्याची मागणी

बोरी : जिंतूर तालुक्यातील कोकपासून जवळच असलेल्या रोहिला पिंपरी रस्त्यावरील गायरान जमिनीतून मागील पंधरा दिवसांपासून मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या मुरमाचा उपसा केला जात आहे. याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी या याकडे लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

बस स्थानकातून वाहते नाल्याचे पाणी

गंगाखेड: येथील बस स्थानक परिसरातून वाहणाऱ्या सांडपाण्याचा नाला तुंबल्यामुळे त्यातील घाण पाणी चक्क बस स्थानकातून वाहत आहे. त्यामुळे बस स्थानकाला तळ्याचे स्वरूप आले आहे. दुर्गंधीयुक्त घाण पाण्यामुळे प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे एसटी महामंडळाच्या प्रशासनाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

४३ गावांतील ग्रामस्थांचा सिंचनाचा प्रश्न सुटेना

परभणी : परभणी व मानवत तालुक्यातील माथ्यावर असलेल्या ४३ गावांमधील शेतकऱ्यांनी सिंचनाच्या प्रश्नावर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना साकडे घातले होते. मात्र, अद्यापही या ४३ गावातील ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्‍न सुटलेला नाही. त्यामुळे या गावातील ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

नियम मोडणाऱ्यांकडून लाखो रुपये वसूल

परभणी: वाहतुकीचे नियम मोडत शहरातील रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनधारकांवर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी दंडात्मक कारवाई केली. यामध्ये मंगळवारी हजारो रुपयांचा महसूल वसूल केला असून, वर्षभरात ६० लाख रुपयांपर्यंतचा दंड वसूल करण्यात आला आहे. मात्र, अद्यापही वाहनधारकांना शिस्त लागत नसल्याने दंडाच्या रकमेत वाढ होत आहे.

वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष

पालम : शहरासह ग्रामीण भागात गंगाखेड येथून वीजपुरवठा करणाऱ्या तारांना ४० वर्षे झाले आहेत. त्यामुळे अतिरिक्त भार येताच, यात तारा तुटून वीजपुरवठा खंडित होत आहे. जुन्या तारा व साहित्यामुळे पालमकराना नेहमीच अंधारात राहावे लागत आहे. यासाठी पालकरांनी वारंवार वीज वितरण कंपनीकडे पाठपुरावा केला आहे. मात्र, ग्रामस्थांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.

Web Title: The resting place should be open for travelers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.