जिल्हा क्रीडा संकुल समितीची फेररचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:18 AM2021-01-03T04:18:07+5:302021-01-03T04:18:07+5:30
परभणीची समिती नावालाच परभणी येथील जिल्हा क्रीडा संकुलाची दयनीय अवस्था झाली आहे. या क्रीडा संकुलाच्या मैदानावर मोठ्या प्रमाणात गवत ...
परभणीची समिती नावालाच
परभणी येथील जिल्हा क्रीडा संकुलाची दयनीय अवस्था झाली आहे. या क्रीडा संकुलाच्या मैदानावर मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. मैदानावर क्रिकेटसाठी पीच तयार करण्याच्या नावाखाली वर्षभरापूर्वी खोदकाम करण्यात आले आहे. या कामासाठी व मैदानाच्या देखभाल दुरुस्तीसाठी २०१९ मध्ये जिल्हा नियोजन समितीच्या वतीने २० लाख रुपयांचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आला होता. त्यातून हे काम चांगल्या कंत्राटदाराला देण्याऐवजी अकार्यक्षम कंत्राटदारास देण्यात आले. सदरील कंत्राटदार अर्धवट काम सोडून गायब झाला. त्यामुळे जिल्हा क्रीडा अधिकारी पवार यांनी बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करण्याऐवजी शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्यांकडे धाव घेतली. त्यांच्या सल्ल्यानुसार कंत्राटदाराची मागणी केली. त्यांनी इमारतींचे बांधकाम करणाऱ्या एका मोठ्या कंत्राटदाराला मैदान दुरुस्तीचे काम सांगितले. सदरील कंत्राटदाराने होकार दिला; मात्र काम केले नाही. त्यामुळे या मैदानाची दुरवस्था कायम आहे. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर या प्रकरणात लक्ष देतील, अशी क्रीडाप्रेमींची अपेक्षा होती; परंतु त्यांनीही याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे या मैदानाच्या दुरुस्तीचा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे क्रीडाप्रेमींमध्ये संतापाची भावना आहे.