सेवानिवृत्त उपशिक्षणाधिकाऱ्याने फुलवला मळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:02 AM2021-02-05T06:02:38+5:302021-02-05T06:02:38+5:30
नांदेड शिक्षण विभागात उपशिक्षणाधिकारी पदावर काम करणारे शंकरराव वाघमारे हे मूळचे पालम तालुक्यातील सरफराजपूर येथील रहिवासी आहेत. तीन ...
नांदेड शिक्षण विभागात उपशिक्षणाधिकारी पदावर काम करणारे शंकरराव वाघमारे हे मूळचे पालम तालुक्यातील सरफराजपूर येथील रहिवासी आहेत. तीन वर्षांपूर्वी ते सेवानिवृत्त झाले होते. यानंतर रावराजूर जिल्हा परिषद सर्कलची निवडणूक लढवून त्यांनी पत्नी पार्वती शंकरराव वाघमारे यांना विजयी केले. कामाचा व्याप वाढूनही शेतीची ओढ स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे वडिलोपार्जित व विकत घेतलेल्या २० एकर जमिनीवर त्यांनी नवनवीन प्रयोग सुरू केले आहेत. आद्रक व हळदीची बेडवर लागवड केली. यात त्यांनी शेवगा, पपई, सीताफळ ही फळपिके लावली आहेत. तर शेतीच्या चहूबाजूंनी मोहगनी वृक्षांची उत्तरांचल येथून रोपे आणून लागवड केली आहे. पारंपरिक पिकांना फाटा देत नवीन प्रयोग केला असून, या पिकांचे उत्पादन सुरू झाले आहे.