शारीरिक व्याधीला कंटाळून सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने संपवले जीवन
By ज्ञानेश्वर भाले | Published: February 1, 2024 03:33 PM2024-02-01T15:33:13+5:302024-02-01T15:33:31+5:30
देवगावफाटा येथील विठ्ठल मुरारी मोरे यांनी राज्य परिवहन विभागात चालक म्हणून सेवा बजावली होती.
देवगावफाटा (जि.परभणी) : देवगावफाटा शिवारातील खंडोबा मंदीर परिसरातील शेत आखाड्यावर शारीरिक व्याधीला कंटाळून सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने झाडाला दोरीच्या सह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी पुढे आली. विठ्ठल मुरारी मोरे (६५) असे मयताचे नाव आहे.
देवगावफाटा येथील विठ्ठल मुरारी मोरे यांनी राज्य परिवहन विभागात चालक म्हणून सेवा बजावली होती. सेवानिवृत्तीनंतर ते देवगावफाटा येथील खंडोबा मंदिर परीसरात शेत आखाड्यावर राहत असत. त्यांनी बुधवारी रात्री कुटुंबातील कोणी नव्हते. यावेळी वाडाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. घटनास्थळी चारठाणा पोलीस ठाण्याचे सपोनी प्रभाकर कापुरे, पोउपनी गणेश कर्हाड, पोलिस जमादार सुनिल वासलवार, वसंत वाघमारे यांनी पंचनामा केला. दरम्यान दम्याचा त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली अशी माहिती पोलीसांनी दिली. सेलू उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन प्रक्रिया सुरू होती.