परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक :रोहयोची कामे न करणाऱ्यांना निलंबित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 12:26 AM2019-01-02T00:26:26+5:302019-01-02T00:27:04+5:30
दुष्काळी परिस्थितीमुळे जनतेतून कामांची मागणी होत असताना ही कामे सुरु न करणाºया ग्रामसेवक व अन्य कर्मचाºयांना निलंबित करा व प्रतिसाद न देणाºया सरपंचांच्या बडतर्फीचे प्रस्ताव सादर करा, असे आदेश विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी मंगळवारी येथे आयोजित आढावा बैठकीत दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : दुष्काळी परिस्थितीमुळे जनतेतून कामांची मागणी होत असताना ही कामे सुरु न करणाºया ग्रामसेवक व अन्य कर्मचाºयांना निलंबित करा व प्रतिसाद न देणाºया सरपंचांच्या बडतर्फीचे प्रस्ताव सादर करा, असे आदेश विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी मंगळवारी येथे आयोजित आढावा बैठकीत दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी अधिकाºयांची आढावा बैठक घेतली. या बैठकीस अप्पर विभागीय आयुक्त विजयकुमार फड, जिल्हाधिकारी पी. शिव शंकर, सीईओं बी.पी.पृथ्वीराज, निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांच्यासह विविध विभागांच्या अधिकाºयांची उपस्थिती होती. यावेळी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचा विषय चर्चेला आला. त्यावेळी जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे लोकांकडून कामांची मागणी केली जात आहे.
या संदर्भात वृत्तपत्रांमध्ये बातम्या येत आहेत. लोकप्रतिनिधी, पत्रकार आम्हाला प्रश्न विचारत आहेत. तुम्ही काय करीत आहात, असा सवाल यावेळी भापकर यांनी केला. एप्रिल महिन्यापासून जवळपास २० हजार विहिरींचे प्रस्ताव दाखल आहेत. त्यातील बहुतांश कामे सुरुच नाहीत. किमान ७ हजार विहिरींची कामे उन्हाळ्यामध्ये होणे अपेक्षित आहे.
रोहयोची कामे ग्रामपातळीवर सुरु न करणाºया ग्रामसेवकांना निलंबित करा व निष्क्रियता दाखविणाºया सरपंचांच्या बडतर्फीचा प्रस्ताव सादर करा, असे आदेशही यावेळी भापकर यांनी यावेळी दिले. ३० आॅक्टोबर रोजी राज्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. त्यावेळेसपासून आतापर्यंत रोहयोची कामे सुरु करण्यासंदर्भात का उपाययोजना करण्यात आल्या नाहीत, याचा जाब यावेळी भापकर यांनी उपस्थित अधिकाºयांना विचारला. यातील कामचुकारपणा खपवून घेतला जाणार नाही, असा सज्जड इशाराही त्यांनी यावेळी दिला.
कृषी अधीक्षक कुठे गायब होतात ?
४या आढावा बैठकीत भापकर यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांच्या कामकाजाबद्दल नाराजी व्यक्त केली. ते जनतेला भेटत नाहीत, अधिकाºयांच्या बैठकीला येत नाहीत, आजच्या बैठकीलाही उपस्थित नाहीत, ते नेमके असतात कुठे, असा सवाल यावेळी भापकर यांनी केला. जेथे आवश्यकता आहे तेथे तातडीने पाण्याचे टँकर सुरु करा व गरजेनुसार चाºयाची उपलब्धता करुन द्या, असेही यावेळी भापकर म्हणाले.