ज्वारीची श्रीमंती वाढली, गव्हापेक्षाही जास्त भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:12 AM2021-07-12T04:12:40+5:302021-07-12T04:12:40+5:30

अशी वाढली ज्वारीची श्रीमंती २००० गहू १२०० ज्वारी ८०० २००५ गहू १४०० ज्वारी १००० २०१० गहू १६०० ज्वारी १४०० ...

The richness of sorghum increased, even higher than that of wheat | ज्वारीची श्रीमंती वाढली, गव्हापेक्षाही जास्त भाव

ज्वारीची श्रीमंती वाढली, गव्हापेक्षाही जास्त भाव

Next

अशी वाढली ज्वारीची श्रीमंती

२००० गहू १२०० ज्वारी ८००

२००५ गहू १४०० ज्वारी १०००

२०१० गहू १६०० ज्वारी १४००

२०१५ गहू १८०० ज्वारी १६५०

२०२० गहू ३००० ज्वारी ४०००

२०२१ जुलै गहू २४०० ज्वारी ३०००

जिल्ह्यात ज्वारीचे उत्पादन घटले

परभणी तसेच सध्याचा हिंगोली जिल्हा या दोन्ही ठिकाणी बहुतांश शेतकरी ज्वारीचे पीक घेत होते. यामुळे परभणीची ओळख राज्यात ज्वारीचे कोठार म्हणून होती. मात्र, कालांतराने शेतीतील झालेले बदल, पाण्याची उपलब्धता आणि अन्य बाबींचा विचार करता शेतकऱ्यांनी ज्वारीचे उत्पादन घेणे कमी केले. यामुळे सध्या परजिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर ज्वारी विक्रीसाठी दाखल होते.

आरोग्याची श्रीमंती ज्वारीतच

ज्वारीची भाकरी पचायला हलकी असते. यामुळे नागरिक सध्या ज्वारीच्या खाद्यपदार्थाला पसंती देत आहेत. गव्हापेक्षा ज्वारी आरोग्याच्या दृष्टीने चांगली असते. यामुळे आहारतज्ज्ञ तसेच आयुर्वेदिक डाॅक्टर अनेकांना ज्वारीचे सेवन करण्याचा सल्ला देतात. यामध्ये ज्येष्ठ नागरिक दररोजच्या आहारामध्ये ज्वारीच्या भाकरीला प्राधान्य देतात.

भाकरी परवडायची म्हणून खायचो

ग्रामीण भागात घरी पिकविलेल्या धान्यातून ज्वारीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत होते. यामुळे गहू विकत आणणे आर्थिकदृष्ट्या परवडत नव्हते. तसेच घरातील सदस्य एकत्रित कुटुंबामुळे जास्त असायचे. अशा वेळी घरातील महिला सकाळी शेतावर जाण्यापूर्वी एकदाच भाकरी तयार करायच्या. - रामभाऊ घाडगे.

गहू केवळ सणासुदीला विकत घ्यायचो. मागील १० ते २० वर्षांपूर्वी ज्वारी स्वस्त होती. तेव्हा गव्हाची किंमत जास्त असायची. यामुळे ज्वारीचे प्रमाण जास्त होते. आता दोन्हीचे भाव थोडेफार कमी जास्त आहेत. मात्र, भाकरी खाणे अद्यापही बंद केले नाही. - पांडुरंग जुमडे.

बार्शीच्या ज्वारीला पसंती

बाजारात जिल्ह्यातील उत्पादित होणाऱ्या ज्वारीचे दर सध्या २००० क्विंटल इतके आहेत. तर बार्शी येथून येणारी मोगरा ज्वारी ३००० रुपये क्विंटल आहे. तसेच स्थानिक गहू १८०० ते २४०० च्या दरम्यान आहे. याशिवाय बाहेरून येणारा गहू २४०० ते ३००० च्या दरम्यान आहे. मागील वर्षी ज्वारीचे दर प्रति क्विंटल ४००० होते तर गहू २५०० ते ३००० एवढ्या दराने मिळायचा.

आता चपातीच परवडते

गहू आणि ज्वारीच्या दरापेक्षा सध्या घरी गव्हाच्या पोळ्या जास्त प्रमाणात केल्या जातात. कधीतरी ज्वारीची भाकरी केली जाते. पूर्वी ज्वारीची भाकरी खात होतो. मात्र, सध्या पोळी खाण्यास पसंती आहे. - भास्करराव नाईक.

Web Title: The richness of sorghum increased, even higher than that of wheat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.