कलावंतांचे प्रश्न सोडविण्यास रिपाइं कटिबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:18 AM2021-07-31T04:18:57+5:302021-07-31T04:18:57+5:30

परभणी : जिल्ह्यातील कलावंतांचे प्रश्न सोडविण्यासाठी रिपाइं कटिबद्ध आहे, अशी ग्वाही राज्य संघटक डी. एन. दाभाडे यांनी दिली. २६ ...

Ripai is committed to solving the problems of artists | कलावंतांचे प्रश्न सोडविण्यास रिपाइं कटिबद्ध

कलावंतांचे प्रश्न सोडविण्यास रिपाइं कटिबद्ध

Next

परभणी : जिल्ह्यातील कलावंतांचे प्रश्न सोडविण्यासाठी रिपाइं कटिबद्ध आहे, अशी ग्वाही राज्य संघटक डी. एन. दाभाडे यांनी दिली.

२६ जुलै रोजी रिपाइंप्रणित स्वरसंगम कलावंत संघटनेची बैठक पार पडली. अध्यक्षस्थानी डी.एन. दाभाडे होते. याप्रसंगी जयप्रकाश इंगोले, कलावंत संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा.अशोक जोंधळे, शेख सरफराज, अप्पा गाडे, भगवान कांबळे, डी. एम. झोडपे, शाहीर नामदेव लहाडे, शाहीर काशिनाथ उबाळे, राहुल शिवभगत, भाऊराव सावने आदींची प्रमुख उपस्थिती होती. दाभाडे म्हणाले, २०२०-२१ या कालावधीत सर्वसामान्यांसोबत कलावंत देखील आर्थिक अडचणीत सापडले आहेत. कलावंत जगला तर समाज जगतो. समाजाला जागे करण्याचे काम कलावंतांच्या माध्यमातून होते. त्यामुळे कलावंतांचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे ते म्हणाले.

कार्यक्रमात विजय वाघमारे, राधाताई पांचाळ तसेच सर्व कलावंतांनी गीत सादर केले. याप्रसंगी शाहीर अंकुश वाटुरे, रंगनाथ कावळे, प्रभावती कांबळे, सुनील हत्तीअंबिरे, धोंडीराम शिराळे, मनीषा वाव्हळे, अहिल्याताई तुपसमुद्रे, विठ्ठल सूर्यवंशी, भास्कर कांबळे आदींनी गीतांचे सादरीकरण केले. बैठकीचे संयोजन स्वरसंगम कलावंत संघटनेचे अध्यक्ष विजय वाघमारे यांनी केले. बैठकीस कलावंत मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Ripai is committed to solving the problems of artists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.