लेंडी नदीला पूर आल्याने पालम तालुक्यातील 12 गावांचा संपर्क तुटला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2019 12:37 PM2019-09-01T12:37:08+5:302019-09-01T12:40:19+5:30

लेंडी नदीला पूर आल्याने पहाटे चार वाजल्यापासून 12 गावांचा संपर्क तुटला आहे.

The river Lendi is flooded in parbhani | लेंडी नदीला पूर आल्याने पालम तालुक्यातील 12 गावांचा संपर्क तुटला

लेंडी नदीला पूर आल्याने पालम तालुक्यातील 12 गावांचा संपर्क तुटला

googlenewsNext
ठळक मुद्दे लेंडी नदीला पूर आल्याने पहाटे चार वाजल्यापासून 12 गावांचा संपर्क तुटला आहे.कमी उंचीच्या पुलामुळे या गावांना दरवर्षी पुराचा फटका बसतो. रस्त्यावरील वाहतूक पूर्णतः बंद झाली असून पुलावरून पाच फूट पाणी वाहत आहे.

पालम (परभणी) - शहरापासून वाहणाऱ्या लेंडी नदीला पूर आल्याने पहाटे चार वाजल्यापासून 12 गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे या गावातील नागरिक अडकून पडले असून दुपारी दोन वाजेपर्यंत पूर ओसारण्याची शक्यता आहे. तालुक्यातील कमी उंचीच्या पुलामुळे या गावांना दरवर्षी पुराचा फटका बसत आहे.

पालम ते जांभुळबेट रस्त्यावर शहरापासून अर्धा किमी अंतरावर लेंडी नदीच्या पात्रात जुना कमी उंचीचा पूल असून या पूलाच्या नळ्या चिखलाने भरून गेले आहेत. त्यामुळे पाऊस पडताच या पुलावरून पाणी वाहत सुरुवात होते पाण्याचा वेग जास्त असल्याने पुलावरून जाता येत नसल्याने वाहतूक ठप्प होत आहे. 31 ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास पाऊस पडल्याने नदीला पूर येऊन हा रस्ता बंद पडला आहे. पहाटे चारपासून या रस्त्यावरील वाहतूक पूर्णतः बंद झाली असून पुलावरून पाच फूट पाणी वाहत आहे. त्यामुळे फळा आरखेड घोडा सोमेश्वर उमरथडी या गावांचा संपर्क तुटलेला आहे. याच नदीवर पालम ते पुयनी या दरम्यान ही कमी उंचीचा पूल आहे. या ठिकाणी रस्त्याच्या बरोबर पाणी आल्याने या मार्गावरील पुयनी आडगाव वनभुजवाडी ते लजापूर नावा नावलगाव कांदलगाव व खडी या गावाचा रस्ता बंद झालेला आहे. दोन्ही ठिकाणी एकच नदी असल्याने पुराचा फटका या गावांना बसत आहे. 

 

Web Title: The river Lendi is flooded in parbhani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.