चौक बाजारातील रस्त्याचे काम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:16 AM2021-03-22T04:16:14+5:302021-03-22T04:16:14+5:30

पोखर्णीत रानडुकरांचा उपद्रव वाढला पोखर्णी नृ.: परभणी तालुक्यातील पोखर्णी व परिसरात रानडुकरांचा उपद्रव वाढला असून, शेतकरी हैराण होत आहेत. ...

Road work in Chowk Bazaar stalled | चौक बाजारातील रस्त्याचे काम रखडले

चौक बाजारातील रस्त्याचे काम रखडले

Next

पोखर्णीत रानडुकरांचा उपद्रव वाढला

पोखर्णी नृ.: परभणी तालुक्यातील पोखर्णी व परिसरात रानडुकरांचा उपद्रव वाढला असून, शेतकरी हैराण होत आहेत. परिसरातील शेतात ही रानडुकरे पिकांची नासाडी करत आहेत. अनेक वेळा शेतकऱ्यांवर हल्लेसुद्धा झाले असल्याने त्यांची दहशत पसरली आहे. सध्या भुईमुगाचे पीक कोवळ्या अवस्थेत आहे. या पिकाचे मोठे नुकसान रानडुकरांकडून होत आहे.

तालुक्यात गुटख्याची खुलेआम विक्री

सोनपेठः शासनाने गुटख्याच्या विक्रीवर बंदी घातली आहे. परंतु, तालुक्यात खुलेआम गुटखा विक्री केल्याचे दिसून येत आहे. अन्न व औषध प्रशासनाने याकडे लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

प्लास्टिकचा वापर धोकादायक

परभणी: प्लास्टिकचा वापर पर्यावरणास धोका निर्माण करणारा आहे. त्यामुळे राज्य शासनाने प्लास्टिक बंदी कायदा अमलात आणला आहे. मात्र, त्याअनुषंगाने जिल्ह्यामध्ये कोणतीही कार्यवाही होताना दिसून येत नाही. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

मजुरांच्या हाताला मिळेना काम

परभणी: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत १ हजारपेक्षा अधिक मजुरांची नोंदणी आहे. मात्र, जिल्हाभरात प्रत्यक्षात ६ हजार मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे. त्यामुळे नोंदणी करूनही मजूर काम मिळण्याच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून येत आहे.

सोनपेठ शहराला विश्रामगृहाची प्रतीक्षा

सोनपेठः तालुक्याच्या निर्मितीनंतर शहरात विविध कार्यालयांची स्थापना होण्याची आशा होती. परंतु, अद्याप येथे शासकीय विश्रामग्रह नसल्याने येथे येणाऱ्या राजकीय पदाधिकारी व अधिकाऱ्यांना खासगी जागेतच बैठका घ्याव्या लागतात. त्यामुळे सोनपेठ शहरात शासकीय विश्रामगृहाची अद्याप प्रतीक्षा आहे.

अतिक्रमणामुळे नागरिक त्रस्त

सोनपेठ : पाथरी, परळी व गंगाखेड या रस्त्यावर व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. या रस्त्यावरून चालताना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच शहरातील शिवाजी चौकात अनेक वेळा वाहतुकीची कोंडी होत आहे.

शासकीय कार्यालयांना इमारतीची प्रतीक्षा

सोनपेठः तालुक्याच्या निर्मितीनंतर शहरात अनेक शासकीय कार्यालये स्थापन झाली. परंतु, यापैकी अद्याप अनेक कार्यालयांना स्वतःच्या मालकीची इमारत नाही. त्यामुळे भाड्याच्या जागेत शासकीय कार्यालय अद्याप कार्यरत आहेत.

वाहतूक पोलीस नियुक्त करण्याची मागणी

मानवत : शहरातील मार्केट परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेसमोर वाहने अस्ताव्यस्त लावण्यात येत असल्याने या ठिकाणी वाहतूककोंडी नित्याची झाली आहे. बँक प्रशासनाने पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून द्यावी व या ठिकाणी वाहतूककोंडी होऊ नये, यासाठी कायमस्वरूपी दोन वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Road work in Chowk Bazaar stalled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.