सेलू तालुक्यात प्रवाशांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:20 AM2021-03-01T04:20:11+5:302021-03-01T04:20:11+5:30

साडेतीन हजार प्रस्ताव रद्द परभणी : शेतकऱ्यांना शाश्वत वीजपुरवठा उपलब्ध व्हावा, यासाठी तत्कालीन राज्य शासनाने मुख्यमंत्री सौर कृषी पंप ...

Robbery of passengers in Selu taluka | सेलू तालुक्यात प्रवाशांची लूट

सेलू तालुक्यात प्रवाशांची लूट

Next

साडेतीन हजार प्रस्ताव रद्द

परभणी : शेतकऱ्यांना शाश्वत वीजपुरवठा उपलब्ध व्हावा, यासाठी तत्कालीन राज्य शासनाने मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अमलात आणली. या योजनेअंतर्गत जिल्ह्यात १० हजार २४ शेतकऱ्यांनी आपले प्रस्ताव दाखल केले. त्यातील महावितरण कंपनीने साडेतीन हजार प्रस्ताव रद्द केले आहेत.

वर्षभरात बसचे ३२ अपघात

परभणी : जिल्ह्यात मागील वर्षभरात बसचे ३२ अपघात झाले आहेत. त्यामध्ये १५ किरकोळ, १२ गंभीर स्वरूपाचे आणि ४ अपघातात मृत्यू ओढवलेला आहे. जिल्ह्यातील रस्त्यांची दुरवस्था हे अपघातांचे प्रमुख कारण आहे. चारही बाजूचे रस्ते खड्डेमय झाले आहेत.

फेडरेशनकडून मिळेनात कापसाचे पैसे

परभणी : खरीप हंगाम २०२०-२१ मध्ये परभणी कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत कापूस फेडरेशनच्या वतीने ९ डिसेंबर ते १ मार्च या काळात शेतकऱ्यांकडून कापसाची खरेदी करण्यात आली. मात्र, अद्यापपर्यंत काही शेतकऱ्यांना कापसाचा मोबदला देण्यात आलेला नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

मास्कच्या वापराला नागरिकांचा फाटा

परभणी : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना मास्क वापरण्यास नागरिक टाळाटाळ करत आहेत. जिल्ह्यातील कोरोनाचा धोका सध्या वाढत आहे. मात्र, नागरिक मास्कचा वापर करणे टाळत आहेत. त्याचप्रमाणे फिजिकल डिस्टन्सचे उल्लंघन होत आहे. प्रशासनाने या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची गरज आहे.

साथ रोगांच्या रुग्णांमध्ये वाढ

परभणी : जिल्ह्यात सध्या वातावरणात बदल झाला आहे. दिवसा कडक ऊन आणि रात्रीच्या वेळी गारवा निर्माण होत आहे. या विचित्र वातावरणामुळे साथीच्या रोगांमध्ये वाढ झाली आहे. सर्दी, खोकला, ताप यासारख्या आजारांच्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे.

रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात

सोनपेठ : शहरातील मुख्य रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले असून, सार्वजनिक जागेवर झालेल्या अतिक्रमणामुळे येथील वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. शहरातील मुख्य असलेल्या पाथरी -परळी व शेळगाव रस्ता अगोदरच अरुंद आहे. त्यातही भर चौकात अतिक्रमण करत प्रतिष्ठाने थाटले आहेत. या ठिकाणी वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

मुळी बंधाऱ्याचे काम थंडबस्त्यात

गंगाखेड : तालुक्यातील गोदावरी नदीपात्रात मुळी येथे उभारलेल्या निम्न पातळी बंधाऱ्याला प्रायोगिक तत्त्वावर बसविलेले स्वयंचलित दरवाजे निकामी झाले आहेत. त्यानंतर या बंधाऱ्याला उभ्या उचल पद्धतीचे दरवाजे बसविण्याच्या कामाचे तांत्रिक अंदाजपत्रक मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. मात्र, हे अंदाजपत्रक मंजूर होत नसल्याने या बंधाऱ्याचे काम थंडबस्त्यात पडल्याचे दिसून येत आहे.

सिंचन विहिरींच्या कामाकडे पाठ

पालम : तालुक्यातील ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर व्हावी, यासाठी रोजगार हमी योजनेअंतर्गत सार्वजनिक सिंचन विहिरींची कामे सुरू करण्यात आली आहेत. मात्र, वेळेवर मजुरांना मजुरी व बांधकाम केलेले कुशल देयके मिळत नसल्याने या कामाकडे ग्रामपंचायतीने पाठ फिरवली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या कायम राहणार आहे.

Web Title: Robbery of passengers in Selu taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.