युवकावर रॉडने जीवघेणा हल्ला; भांडण सोडविण्यास जाणे पडले महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 04:13 PM2018-05-11T16:13:53+5:302018-05-11T16:13:53+5:30

भांडण सोडविल्याच्या कारणावरून दुचाकी अडवून एकावर जिवघेणा हल्ला केल्यावरून आज गंगाखेड पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Rod assaulted by a man; To solve the fight, the castle had to go | युवकावर रॉडने जीवघेणा हल्ला; भांडण सोडविण्यास जाणे पडले महागात

युवकावर रॉडने जीवघेणा हल्ला; भांडण सोडविण्यास जाणे पडले महागात

googlenewsNext

गंगाखेड (परभणी ) : भांडण सोडविल्याच्या कारणावरून दुचाकी अडवून एकावर जिवघेणा हल्ला केल्यावरून आज गंगाखेड पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बोर्डा येथील नामदेव पंडीतराव मुंडे (३२) हा युवक सोमवारी (दि. ७) रात्री ८:३० वाजेच्या सुमारास गंगाखेड येथुन दुचाकीवर (एमएच -२०- डी झेड -२८६५) घराकडे जाण्यासाठी निघाला. यावेळी शहरातील दत्त मंदीर परीसरात त्याची गाडी नारायण बालाजी मुंडे याने अडवली, माझे व ज्ञानोबा लटपटे यांचे भांडण का सोडविले असे विचारत त्याने नामदेवला जीवे मारण्याची धमकी दिली.  यानंतर नामदेवला रस्त्याच्या बाजूला नेत काही समजायच्या आत त्याच्यावर लोखंडी रॉडने हल्ला करत डोक्यात मारले. यानंतर अंधारात दबा असलेले अंगद बालाजी मुंडे, बालाजी मुंडे, बंडू विनायक नागरगोजे, दिपक नागरगोजे यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले.

परभणी येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेतांना नामदेव याने या हल्याची माहिती पोलिसांना देत हल्लेखारांविरोधात  तक्रार दाखल केली. पुढील तपास पोउपनि राहुल बहुरे, पो.शि. ओम वाघ हे करीत आहेत.

Web Title: Rod assaulted by a man; To solve the fight, the castle had to go

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.