महिलांना छेडणाऱ्या रोडरोमिओने पोलिसावर केला चाकूने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:22 AM2021-09-17T04:22:53+5:302021-09-17T04:22:53+5:30

पाथरी पोलीस ठाण्याचे एक पथक बुधवारी रात्री ८.३० च्या सुमारास शहरातील देवनांद्रा शाळा परिसरात गस्तीवर असताना रोडरोमिओ मुजाहीद मुखीद ...

Rodrमिguez, who was teasing the women, stabbed the police | महिलांना छेडणाऱ्या रोडरोमिओने पोलिसावर केला चाकूने वार

महिलांना छेडणाऱ्या रोडरोमिओने पोलिसावर केला चाकूने वार

Next

पाथरी पोलीस ठाण्याचे एक पथक बुधवारी रात्री ८.३० च्या सुमारास शहरातील देवनांद्रा शाळा परिसरात गस्तीवर असताना रोडरोमिओ मुजाहीद मुखीद कुरेशी (३०, रा. कुरेशी/मुर्तुझा मोहल्ला पाथरी) हा रस्त्याने ये-जा करणाऱ्या महिलांना पाहून शिट्ट्या वाजवत होता. तसेच त्यांची छेड काढत होता. हे दृश्य गस्तीवरील पोलिसांनी पाहिल्यानंतर त्याला पोलिसांनी समज देऊन घरी निघून जाण्यास सांगितले. यावेळी मुजाहीद मुखीद कुरेशी याने पोलिसांशी हुज्जत घालत येथून जात नाही, काय करायचे ते करा, असे सांगून अरेरावीची भाषा वापरली. तसेच पोलीस कर्मचारी सुरेश सुधाकरराव कदम यांना जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्याजवळ कंबरेला असलेला चाकू काढून कदम यांच्या मानेवर वार केला. यावेळी कदम यांनी चपळाई दाखवत हा वार चुकविला. हे दृश्य पाहून इतर पोलीस कर्मचारी धावले असता तो पळून जाऊ लागला. पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरू केला असता काही अंतरावर तो खाली पडला. यावेळी पोलिसांनी त्याला पकडले. पोलिसांनी पकडल्यानंतरही मुजाहीद मुखीद कुरेशी हा पोलिसांशी झटपट करू लागला. यावेळी पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. पोलीस कर्मचारी सुरेश कदम यांनी पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली. त्यावरून आरोपी मुजाहीद मुखीद कुरेशी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Rodrमिguez, who was teasing the women, stabbed the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.