सात दिवसांत ६ हजार नागरिकांची आरटीपीसीआर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:18 AM2021-01-03T04:18:10+5:302021-01-03T04:18:10+5:30
परभणी : येथील आरोग्य विभागाने मागील आठवड्याच्या दिवसांत ६ हजार १९६ नागरिकांच्या आरटीपीसीआर तपासण्या केल्या असून, जिल्हा परिषदेच्या आरोग्य ...
परभणी : येथील आरोग्य विभागाने मागील आठवड्याच्या दिवसांत ६ हजार १९६ नागरिकांच्या आरटीपीसीआर तपासण्या केल्या असून, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने यात सर्वाधिक ४ हजार ८३ नागरिकांच्या तपासण्या केल्या.
आरोग्य मंत्री राजेश टोपे हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले तेव्हा त्यांनी आरटीपीसीआर तपासण्या वाढविण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या होत्या; मात्र त्यानंतरही तपासण्या वाढल्या नव्हत्या. मागील आठवड्यात झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्यातील तपासण्यांबाबत नाराजी व्यक्त केली होती. या व्हीसीनंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी जि.प. सभागृहात सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आरटीपीसीआर तपासण्या वाढविण्याच्या सूचना केल्या. त्याचप्रमाणे त्याच दिवशी शहरातून रॅली काढत नागरिकांना चाचणी करून घेण्याचे आवाहन केले होते.
या आवाहनानंतर आरोग्य विभागाने आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या वाढविण्यास प्रारंभ केला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रत्येक नागरिकाची ही चाचणी केली जात आहे. जिल्हा परिषदेतील सर्व अधिकारी- कर्मचाऱ्यांच्याही तपासण्या पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे सात दिवसांतच आरटीपीसीआरचा आकडा वाढला आहे. सरत्या आठवड्यात संपलेल्या सात दिवसांत जिल्ह्यात ६ हजार १९६ नागरिकांच्या तपासण्या करण्यात आल्या. त्यामध्ये ४ हजार ८३ नागरिकांच्या तपासण्या जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने केल्या असून, २ हजार ७७ तपासण्या जिल्हा शल्य चिकित्सकांंच्या अंतर्गत येणाऱ्या रुग्णालयांमध्ये करण्यात आल्या आहेत.
आरटीपीसीआरमध्ये सेलू तालुका आघाडीवर
सेलू तालुक्यात सर्वाधिक १ हजार ३३७ आरटीपीसीआर तपासण्या झाल्या आहेत. त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने (डीएचओ) ७१७ जणांच्या तपासण्या केल्या आहेत तर दुसरीकडे जिल्हा शल्य चिकित्सकांच्या (सीएस) अंतर्गत ६२० नागरिकांच्या तपासण्या केल्या. पाथरी तालुक्यतात डीएचओ विभागाने ५९६ तर सीएस विभागाने ३०० नागरिकांच्या तपासण्या केल्या आहेत. गंगाखेड तालुक्यात डीएचओ अंतर्गत ९५५ आणि सीएस अंतर्गत ३७० नागरिकांच्या तपासण्या आल्या. पालम तालुक्यात हे काम अतिशय संथ सुरू आहे. या तालुक्यात केवळ १९५ नागरिकांच्याच आरटीपीसीआर तपासण्यात झाल्या आहेत. त्यात डीएचओ अंतर्गत १९४ आणि सीएस अंतर्गत एका नागरिकाची तपासणी केली आहे.
तालुकानिहाय झालेल्या तपासण्या
सेलू : १,३३७
पाथरी : ५९६
मानवत : ४०६
जिंतूर : ४७०
परभणी : ७७१
पूर्णा : २०३
मालम : १९५
गंगाखेड : १३२५
सोनपेठ : ७०८