पोखर्णीत आरटीपीसीआर चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:19 AM2021-03-01T04:19:51+5:302021-03-01T04:19:51+5:30

वीजपुरवठा सुरळीत देवगावफाटा: सेलू तालुक्यातील देवगावफाटा येथे वीजपुरवठा करणाऱ्या विद्युत रोहित्रातील जळालेली वायरिंग व फ्यूज शनिवार दुरुस्त करून वीजपुरवठा ...

RTPCR test in pond | पोखर्णीत आरटीपीसीआर चाचणी

पोखर्णीत आरटीपीसीआर चाचणी

Next

वीजपुरवठा सुरळीत

देवगावफाटा: सेलू तालुक्यातील देवगावफाटा येथे वीजपुरवठा करणाऱ्या विद्युत रोहित्रातील जळालेली वायरिंग व फ्यूज शनिवार दुरुस्त करून वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. देवगाव येथे वीजपुरवठा करणाऱ्या विद्युत रोहित्रातील वायरिंग व फ्यूज गुरुवारी जळून खाक झाले होते. त्यानंतर वीज वितरण कंपनीकडे ग्रामस्थांनी तक्रार केली होती. त्यानंतर शनिवारी हा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. यासाठी चेअरमन बाबुअप्पा साळेगावकर, मोकिंद मोरे, गुलाब मोरे, भगवान सातपुते, राजेभाऊ पवार, पंडित मोरे, लक्ष्मण सोन्ने, विठ्ठल सातपुते, नागनाथ साळेगावकर यांनी पुढाकार घेतला.

हिस्सी येथे स्वच्छता अभियान

हिस्सी: सेलू तालुक्यातील हिस्सी येथे संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यामध्ये गावातील मुख्य रस्त्यांसह जिल्हा परिषद शाळेचा परिसर स्वच्छ करण्यात आला. यावेळी सरपंच दीपक गोरे, मुख्याध्यापक दिलीप मोगल, अंगणवाडी सेविका मंदाकिनी गात, अरुण गात, गोदावरी गोरे, कलावती गवळी, मधुकर कवडे, बाळासाहेब मगर, अर्जुन मगर आदींची उपस्थिती होती.

ताडकळस येथील समस्या सोडविण्याची मागणी

ताडकळस: पूर्णा तालुक्यातील ताडकळस येथील बौद्ध, मातंग, चर्मकार या मागासवर्गीय वस्तीत मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी ग्रा.पं.सदस्या छायाताई सुरेश मगरे यांनी आ.रत्नाकर गुट्टे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील खुले सभागृह, भीमनगर, साठेनगरात, सांस्कृतिक सभागृह तसेच मागासवर्गीय स्मशानभूमीसाठी संरक्षण भिंत, पेव्हर ब्लॉक, पाण्याची सोय, विद्युत खांब आदी सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

असोला येथे व्याख्यान कार्यक्रम

असोला: परभणी तालुक्यातील असोला येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिव व्याख्याते डॉ.नागेश गवळी यांचे व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्‌घाटन आनंद भरोसे यांच्या हस्ते झाले. यावेळी जवान भरत भरोसे, सुभाष जावळे, पं.स. सदस्या मीनाक्षीताई भरोसे, सरपंच वच्छलाबाई जावळे, उपसरपंच त्र्यंबक भरोसे, गजानन जोगदंड, बालाजी मोहिते, अर्जुन वैरागर, माधव जावळे यांची उपस्थिती होती.

Web Title: RTPCR test in pond

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.