सत्ताधारी विद्यमान पॅनल पराभूत, नवागतांना संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:18 AM2021-01-20T04:18:38+5:302021-01-20T04:18:38+5:30
गंगाखेड तालुक्यातील महत्वाच्या ग्रामपंचायत मध्ये परिवर्तन होऊन नवागतांना संधी दिली. इसाद येथे जि.प.सदस्य किशनराव भोसले यांच्या विद्यमान पॅनलला पराभव ...
गंगाखेड तालुक्यातील महत्वाच्या ग्रामपंचायत मध्ये परिवर्तन होऊन नवागतांना संधी दिली. इसाद येथे जि.प.सदस्य किशनराव भोसले यांच्या विद्यमान पॅनलला पराभव पत्करावा लागला. कोद्री येथे महाविकास आघाडीला यश आले.पडेगाव ग्रामपंचायत विद्यमान पॅनल कृऊबाचे माजी सभापती बालासाहेब निरस याच्या पॅनलचा पराभव झाला.येथे नवीन पॅनल नागनाथ निरस याचा पॅनल विजयी झाला.वाघलगाव ग्रामपंचायतीत सत्तारूढ पॅनलचे नारायण घनवटे याच्या पॅनलला पराभवाला सामोरे जावे लागले. या ठीकाणी शिवाजी घनवटे याच्या पॅनलचा विजय झाला.सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या राणीसावरगाव मध्ये महाविकास आघाडीचे १७ पैकी १२ सदस्य विजयी झाले. जवळा ग्रामपंचायत सत्तारूढ पॅनल पराभूत होऊन नविन पॅनलाला संधी दिली. धारखेड ग्रामपंचायतीत सत्ताधारी पॅनलचा परभव होऊन मुजाजी चोरघडे,लालु चोरघडे याच्या पॅनलला यश आले. प्रतिष्ठित असलेली वाघदरी येथे विद्यमान पॅनलचा पराभव झाला. बोर्डा येथे माजी नगराध्यक्ष रामप्रभु मुंढे याचे सत्तारूढ पॅनल विजयी झाले.धारासुर येथे नवागतांना संधी मिळाली. येथे भाजपाचे जिल्हा अध्यक्ष डाॅ.सुभाष कदम याच्या पॅनलचा पराभव झाला.धनगरमोहा येथे विद्यमान सत्तारूढ पॅनलचा पराभव झाला. पिंपळदरी ग्रामपंचायत मध्ये कृउबाचे माजी उपसभापती पंडित मुंढे याचे पॅनल विजयी ठरले. तालुक्यातील बहुतांशी ग्रामपंचायतीत नवागतांना संधी दिली.सत्तधारी पॅनलचा चक्राऊन सोडणारा परभव झाल्याचे दिसुन येते.राजकिय पक्ष दावे प्रतिदावे करत आहेत. निवडून आलेल्या पॅनल मध्ये सर्व पक्षातील सदस्य असल्याने पक्षाचा नव्हे तर गावपुढारी, गावच्या विचाराचा विजय झाला आहे.