परभणी जिल्हा क्रीडा संकुलात तयार होईना रनिंग ट्रॅक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 11:16 PM2019-06-05T23:16:25+5:302019-06-05T23:18:41+5:30
येथील जिल्हा क्रीडा संकुलात खेळाडुंसाठी रनिंग ट्रॅक तयार करण्याचे आदेश तत्कालीन क्रीडा आयुक्त तथा विभागीय आयुक्त सुुनिल केंद्रेकर यांनी क्रीडा अधिकाऱ्यांना दिले होते. मात्र एक वर्षाचा कालावधी उलटल्यानंतरही अद्याप क्रीडा संकुलात रनिंग ट्रॅक तयार करण्यात आला नाही. त्यामुळे येथील क्रीडा अधिकाऱ्यांनी आयुक्तांच्या आदेशालाच खो दिल्याचे दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील जिल्हा क्रीडा संकुलात खेळाडुंसाठी रनिंग ट्रॅक तयार करण्याचे आदेश तत्कालीन क्रीडा आयुक्त तथा विभागीय आयुक्त सुुनिल केंद्रेकर यांनी क्रीडा अधिकाऱ्यांना दिले होते. मात्र एक वर्षाचा कालावधी उलटल्यानंतरही अद्याप क्रीडा संकुलात रनिंग ट्रॅक तयार करण्यात आला नाही. त्यामुळे येथील क्रीडा अधिकाऱ्यांनी आयुक्तांच्या आदेशालाच खो दिल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यात दर्जेदार खेळाडू निर्माण होऊन राज्य व देशपातळीवर जिल्ह्याचा नाव लौकिक करावा, या हेतूने प्रत्येक तालुक्यासह जिल्ह्याच्या ठिकाणी क्रीडा संकूल उभारण्यात आले. परभणी शहरात प्रियदर्शनी इंदिरा गांधी नावाने दोन ते चार एकरमध्ये सुसज्ज असे क्रीडा संकूल उभारण्यात आले आहे.
या ठिकाणी ग्रामीण भागासह शहरातील खेळाडू सराव करण्यासाठी येतात; परंतु, मागील काही वर्षापासून या क्रीडा संकुलाची दुरवस्था झाली आहे. जागोजागी कचºयाचे ढीग, त्याच बरोबर संकुलावर टाकण्यात आलेली पत्रेही वादळी वाºयात उडून गेली आहेत. तर काहींची दुवस्था झाली आहे. सरावासाठी येणाºया खेळाडुंना कोणतीही सुविधा उपलब्ध करून देण्यात येत नाही. त्याच बरोबर मैदानावर पाणीही मारण्यात येत नाही. त्यामुळे खेळाडुंना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. एक वर्षापूर्वी तत्कालीन क्रीडा आयुक्त सुनिल केंद्रेकर हे परभणी जिल्हा दौºयावर आले असता त्यांनी जिल्हा क्रीडा संकुलाची पाहणी केली. त्यावेळी संकुलात असलेली अस्वच्छता पाहूून तत्कालीन क्रीडा अधिकारी चंद्रशेखर साखरे यांना चांगलेच धारेवर धरले होते. स्वत: व इतर अधिकाºयांसमवेत संकुलातील कचरा केंद्रेकर यांनी वेचला होता. त्यानंतर त्यांनी प्रत्येक विभागाची पाहणी करून तीव्र नाराजी व्यक्त केली होती. शहरातील नागरिकांच्या व खेळाडुंच्या तक्रारी ऐकून घेत तत्कालीन क्रीडा अधिकारी साखरे यांना एक महिन्याच्या आत क्रीडा संकुलात रनिंग ट्रॅक तयार करा? असे आदेश दिले होते; परंतु, क्रीडा संकुलात खेळाडुंना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यात असमर्थता दाखविणाºया क्रीडा अधिकाºयांनी केवळ क्रीडा आयुक्तांसमोर मान हलविण्याचे काम केले. आयुक्त केंद्रेकर यांनी रनिंग ट्रॅक उभारण्याचे आदेश देऊनही अद्यापपर्यंत या संदर्भात क्रीडा अधिकाºयांनी कोणत्याही हालचाली सुरू केल्या नाहीत. त्यामुळे परभणी येथील क्रीडा विभागाने चक्क आयुक्तांच्या आदेशालाच खो दिल्याचे दिसून येत आहे. परिणामी क्रीडा प्रेमींमधून संताप व्यक्त केला जात आहे.
तालुक्यातील क्रीडा संकुलाचीही दुरवस्था
४तालुकास्तरावरील खेळाडुंना आपल्याच शहराच्या ठिकाणी कबड्डी, खो-खो, क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल, पोलीस भरती आदी बाबत सराव करण्यासाठी तालुकास्तरावर क्रीडा संकुलाची निर्मिती करण्यात आली. मात्र जिल्ह्यातील पूर्णा, जिंतूर, सेलू, सोनपेठ यातील काही ठिकाणी तर संकुलच अस्तित्वात नाही. तर ज्या ठिकाणी क्रीडा संकुल आहे, त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे क्रीडा विभागाच्या उदासिन भूमिकेमुळे दर्जेदार खेळाडू तयार होण्यास ब्रेक लागत असल्याचे नागरिकातून बोलल्या जात आहे.